scorecardresearch

Premium

IPL 2024 : आरसीबीच्या निर्णयावर ब्रॅड हॉगने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘या’ खेळाडूला खरेदी करून केली मोठी चूक

Brad Hogg on RCB : आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी ब्रॅड हॉगने आरसीबीच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे सांगितले.

IPL 2024 Auction updates in marathi
आरसीबीच्या निर्णयावर ब्रॅड हॉगने उपस्थित केला प्रश्न (फोटो-एपी फोटो)

Brad Hogg Says RCB took wrong decision : आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे, परंतु त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबीने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनचा आपल्या ताफ्यात समावेश केला. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आरसीबीचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि त्यामागील कारणही सांगितले. कारण मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला खरेदी करण्यासाठी आरसीबीसोबत ग्रीनला ट्रेड केले होते.

ग्रीनला खरेदी करणे हा आरसीबीसाठी योग्य निर्णय नाही –

कॅमेरून ग्रीनने मुंबईसाठी एक हंगाम खेळला असून १६ सामन्यात ४५२ धावा केल्या आणि ६ विकेट घेतल्या. आरसीबीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला १७.५ कोटी रुपयांना विकत घेतले. परंतु हॉगला वाटते की हा योग्य पर्याय नव्हता. हॉगने त्याच्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘आरसीबीने ग्रीनची निवड करुन चूक केली आहे. कारण त्यांना वाटले की, तो लिलावात आणखी महाग ठरु शकतो, म्हणून त्याला ट्रेड केले. हॉग पुढे म्हणाला की आरसीबीने चुकीची निवड केली. कारण आरसीबीने आधीच त्यांच्या गोलंदाजी लाइनअपवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. त्यामुळे आता दर्जेदार गोलंदाज खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे.

husband wife dispute
‘पती आईला वेळ-पैसे देतो’ म्हणून पत्नीने केली कौटुंबिक हिंसाचाराची केस; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?
man killed his mother for opposing immoral relationship
वर्धा : अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

हॉगला असेही वाटते की आरसीबी ऐवजी ग्रीन दुसर्‍या फ्रँचायझीसाठी योग्य ठरला असता. तो म्हणाला की मुंबईने हार्दिकला त्यांच्याकडे आणण्यासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि व्यावसायिक कारणांमुळे ग्रीनला संघातून वगळले. त्यांच्यासाठी ही एक चांगली चाल होती, परंतु आरसीबीला ती ओळखत आली नाही. कारण त्यांना वाटले ग्रीन लिलावात गेला, तर त्याला खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागले असते.

हेही वाचा – PAK vs AUS : बाबर आणि पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार शान मसूद यांच्यात कसे आहे नाते? सरफराजने सांगितले सत्य

ग्रीन इतर कोणत्याही संघासाठी योग्य ठरला असता –

ब्रॅड हॉग पुढे म्हणाला, जेव्हा मी आरसीबीकडे पाहतो, तेव्हा मला वाटते की हा एक वाईट निर्णय होता. या संघाकडे बघितले तर ते त्यांच्या फलंदाजीच्या क्रमावर प्रचंड पैसा खर्च करतात, पण चांगल्या गोलंदाजांवर खर्च करण्याएवढी रक्कम त्यांच्याकडे नाही. आयपीएलमध्ये एकूण बचाव करण्यासाठी आणि खेळात समतोल राखण्यासाठी तुम्हाला चांगल्या गोलंदाजांची गरज असते. यामुळे मला असे वाटते की, हा आरसीबीचा योग्य निर्णय नाही. ग्रीन इतर कोणत्याही संघासाठी योग्य ठरू शकला असता, परंतु आरसीबीने हा पर्याय निवडला आणि मला वाटत नाही की त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to brad hogg rcb took the wrong decision to acquire cameron green from mumbai indians for ipl 2024 vbm

First published on: 04-12-2023 at 18:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×