scorecardresearch

Premium

Asia Cup 2023: वसीम जाफरने संघ व्यवस्थापनाला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, सूर्यकुमार यादवला ‘या’ क्रमांकावर खेळवा

Wasim Jaffer’s statement: आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला स्थान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या. आता त्याच्याबद्दल भारताच्या माजी क्रिकेपटूने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Wasim Jaffer's statement on Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादव आणि वसीम जाफर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Wasim Jaffer’s statement on Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवची टी-२० फॉर्मेटमध्ये कामगिरी प्रभावी असली तरी, वनडेमध्ये त्याची आकडेवारी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. त्याने आतापर्यंत एकदिवसीय फॉर्मेटमध्ये २६ सामने खेळले असून या कालावधीत त्याला केवळ ५११ धावा करता आल्या आहेत. हा खराब फॉर्म असूनही संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर खूप विश्वास दाखवत आगामी आशिया चषक स्पर्धेत त्याला संधी दिली आहे. अशात माजी क्रिकेटर वसीम जाफरने सूर्यकुमार यादवबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सांगितले की, सूर्यकुमार यादवने सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळले पाहिजे. तो म्हणाला की, ३२ वर्षीय खेळाडूला आक्रमक क्रिकेट खेळायला आवडते, परंतु त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये समान भूमिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमारला सहाव्या क्रमांकावर आजमावले पाहिजे, असे जाफरचे मत आहे.

disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Video of fan saying I love you' to Mahi Bhai
MS Dhoni: ‘माही भाई आय लव्ह यू’, चाहत्याच्या या हाकेला महेंद्रसिंग धोनी काय दिले उत्तर? पाहा VIDEO
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका
Rohit Sharma reveals last minute KL Rahul and Shreyas Iyer swap Before IND vs PAK Asia Cup Super 4 Match Highlights
“IND vs PAK नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, रोहित शर्माचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

वसीम जाफर सूर्यकुमार यादवबद्दल म्हणाला –

स्पोर्ट्स लाँचपॅडशी बोलताना वसीम जाफर म्हणाला, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी सूर्यकुमार यादवकडे गेम आहे. तो माझ्या कर्णधारपदाखाली खेळला आहे आणि त्याने माझ्यासमोर पदार्पण केले आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. म्हणून, त्याला त्या नंबरची सवय आहे, जरी तेव्हापासून त्याचा खेळ पूर्णपणे बदलला असला, तरी तो नेहमीच एक गतिमान खेळाडू राहिला आहे. मला वाटते की, त्याला टी-२० क्रिकेटमधून एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल करणे कठीण जात आहे.”

हेही वाचा – Asia Cup 2023 पूर्वी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, श्रीलंकेला रवाना होणाऱ्या संघात ‘हा’ खेळाडू होणार नाही सहभागी

माजी सलामीवीर पुढे म्हणाला, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुमच्याकडे भिन्न कौशल्ये असणे आवश्यक आहे. त्याला त्यावर काम करण्याची गरज आहे. मला वाटते की सहावा क्रमांक त्याच्यासाठी ५० षटकांत योग्य पोझिशन आहे. सहाव्या क्रमांकावर, तो ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो ते खेळू शकतो. एखाद्या फिनिशरप्रमाणे.”

हेही वाचा – Asia Cup 2023: युजवेंद्र चहलची टीम इंडियात निवड न झाल्याने एबी डिव्हिलियर्स निराश; म्हणाला, “युजी नेहमीच खूप…”

भारतीय संघ व्यवस्थापन सूर्यकुमारला चौथ्या क्रमांकावर आजमावू शकतो –

उल्लेखनीय म्हणजे, सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर संघात स्थान मिळणे कठीण होईल. कारण संघ व्यवस्थापन त्याच्या जागी अष्टपैलू कौशल्यासाठी हार्दिक पांड्याला प्राधान्य देऊ शकते. इतर सर्व स्थानांसाठी, संघात खेळाडू आहेत. आता संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यरवर सट्टा लावू शकते. जर तो छाप पाडण्यात अपयशी ठरला, तर ते आगामी आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव किंवा तिलक वर्माकडे वळू शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to wasim jaffer the team management should give suryakumar yadav a chance to play at number six vbm

First published on: 27-08-2023 at 16:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×