माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकरचे मत
जगातल्या वेगवान गोलंदाजांचा सामना करीत फलंदाजी करण्यापेक्षा चरित्रपटासाठी कॅमेऱ्याचा सामना करणे अवघड असल्याचे मत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अनेक वर्षे मी क्रिकेट खेळलो आणि कॅमेरा टिपत गेला. अचानक कॅमेऱ्यासमोर विशिष्ट गोष्ट करण्याचे मला सांगण्यात आले. हा अनुभव माझ्यासाठी सर्वस्वी वेगळा होता. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत फलंदाजी करणे माझ्यासाठी सोपे होते,’ असे सचिनने सांगितले. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स यांच्यातर्फे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे होणाऱ्या अर्धमॅरेथॉनचा सदिच्छादूत म्हणून सचिनच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्या वेळी तो बोलत होता. तो पुढे म्हणाला, ‘‘अभिनयाचा मी कधीही विचार केला नाही. क्रिकेटच्या तुलनेत अभिनय करणे केव्हाही कठीणच आहे. खेळण्याचा मी पुरेपूर आनंद घेतला आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acting was more challenging than playing cricket says sachin tendulkar
First published on: 15-04-2016 at 04:14 IST