बिग बॅश लीग २०२२-२३ (BBL 2022-23) या स्पर्धेला १३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. आगामी हंगामासाठी मेलबर्न स्टार्सचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाची नियुक्ती करण्यात आली आहे. मेलबर्न स्टार्सने ७ डिसेंबर रोजी अधिकृतपणे घोषित केले की, अ‍ॅडम झाम्पा जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी आगामी बीबीएलच्या बाराव्या हंगामात कर्णधार म्हणून भूमिका पार पडेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस उपकर्णधार असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा गेल्या महिन्यात वाढदिवसाच्या पार्टीत त्याचा अपघात झाला होता. ज्यामध्ये त्याचा पाय मोडला आहे.ज्यामुळे तो संपूर्ण बीबीएल २०२२-२३ हंगामातून बाहेर पडला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर, बीबीएलच्या पाचव्या हंगामात मेलबर्न स्टार्समध्ये सामील झाला. तेव्हापासून तो संघाचा एक भाग आहे. तसेच या स्पर्धेतून त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे. ज्यामुळे आज तो जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयाला आला आहे. तो मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया संघाचा एक मुख्य फिरकीपटू आहे.

मेलबर्न स्टार्सच्या वेबसाइटनुसार, अ‍ॅडम झाम्पाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत मेलबर्न स्टार्सचे नेतृत्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या गटासह आगामी बीबीएल बाराव्या हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट गोष्टी आणण्यासाठी मी स्टार्सना मदत करण्यास उत्सुक आहे. आमच्या स्टार्सचा प्रवास बीबीएल ट्रॉफीशिवाय पूर्ण होणार नाही. तसेच आम्ही विजेतेपद मिळवण्यासाठी या मोसमात आमचे सर्व काही देण्यास उत्सुक आहोत.”

हेही वाचा – Suresh Raina Video: लॉर्डसच्या ग्राऊंडवरुन थेट गल्लीच्या मैदानावर; सुरेश रैनाचा साधेपणा चाहत्यांनाही भावला

झाम्पा पुढे म्हणाला, ”मी प्रथमच ट्रेंट बोल्ट आणि ल्यूक वुड यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. मी उपकर्णधार म्हणून मार्कस स्टॉइनिसच्या मदतीने स्टार्सचे नेतृत्व करण्यास थांबू शकत नाही. १६ डिसेंबर रोजी एमसीजी येथे बीबीएल २०२२-२३ मधील आमच्या पहिल्या सामन्यात आम्ही शक्य तितक्या जास्त चाहत्यांना पाहू इच्छितो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adam zampa will replace glenn maxwell to lead the melbourne stars in the twelfth season of the big bash league vbm
First published on: 07-12-2022 at 18:47 IST