महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी वानखेडे स्टेडियमला ​​भेट दिली आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) तयारीचा आढावा घेतला. आयपीएलचे सामने २६ मार्चपासून महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये चार ठिकाणी होणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या सदस्याने पीटीआयला सांगितले, “आज माननीय मंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी आयपीएल २०२२ची व्यवस्था करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन/बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली.”

”मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे आयोजन करताना महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मी आज वानखेडे स्टेडियमला भेट दिली, कारण आम्ही स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी उत्सुक आहोत. आम्ही सर्व संघांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहोत”, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बीसीसीआयचे सीईओ आणि आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन, मुंबई टी-२० लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर आणि एमसीएच्या शिखर परिषदेचे सदस्य अजिंक्य नाईक आणि नदीम मेमन हेह आदित्य यांच्याशी चर्चेसाठी उपस्थित होते. “महाराष्ट्रासाठी ही एक मोठी क्रीडा स्पर्धा असेल,” असे सदस्य म्हणाले.

हेही वाचा – ‘‘धोनीला भेटणं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं…”, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं सांगितली ‘ती’ आठवण!

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी १० संघांचे गट जाहीर करण्यात आले आहे. हे संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध दोनदा आणि उर्वरित चार संघांविरुद्ध फक्त एकदाच खेळताना दिसेल. सर्व १० संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.