AFG vs NZ Test match to be abandoned due to rain : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, ग्रेटर नोएडामधील एकमेव कसोटी सामन्याचे सुरू असलेले नाट्य आता संपले आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना ओले मैदान आणि त्यानंतर मुसळधार पावसामुळे वाया गेला आहे. या सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नव्हती, आता सामन्याच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना वाया गेल्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला गेला आहे.

अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द –

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये लिहिले, “ग्रेटर नोएडामध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि सततच्या पावसामुळे, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस देखील सामना अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.”

Virat Kohli and Rohit Sharma arrived in Chennai
IND vs BAN : कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, विराट-रोहितचा विमानतळावरील VIDEO व्हायरल
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Shreyas Iyer came to bat with Sunglasses brutally trolled
Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Team India WTC final 2025 qualification scenario
WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण
What are the bat size limits as per MCC
भलत्याच आकाराची बॅट वापरल्याने इंग्लंडमधल्या काउंटीत इसेक्सला फटका; काय आहेत बॅटच्या आकाराचे नियम?
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार

हे थोडे निराशाजनक आहे, परंतु या कसोटीची स्थिती पाच दिवस अशीच राहीली. ग्रेटर नोएडा आणि आजूबाजूच्या परिसरात भरपूर पाऊस पडला असला तरी, खेळाची शक्यता, विशेषत: सुरुवातीच्या दिवशी, खूप जास्त होती, परंतु चिखलामुळे आणि खराब ड्रेनेज सिस्टममुळे पाच दिवस एकही चेंडू टाकता आला नाही.

हेही वाचा – Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर

कसोटी क्रिकेटमध्ये घडली एक अनोखी घटना –

खरे तर, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही आठवी वेळ आहे. २६ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये हे प्रथमच पाहायला मिळाले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कॅरिसब्रुक, ड्युनेडिन येथे १९९८ मध्ये असा शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता, जेव्हा कसोटी सामन्यात एकही चेंडू खेळता आला नाही. १८९० साली पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता, जेव्हा कसोटीत एकही चेंडू टाकता आला नाही. आता १९९८ नंतर ही अनोखी घटना पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा – Simi Singh Liver Transplant : स्टार अष्टपैलू खेळाडूचा पत्नीमुळे वाचला जीव, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली यशस्वी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच दिवस एकही चेंडू न खेळता रद्द झालेले सामने –

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओल्ड ट्रॅफर्ड (१८९०)
  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओल्ड ट्रॅफर्ड (१९३०)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (१९७०)
  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, कॅरिसब्रुक (१९८९)
  • वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, बोर्डो (१९९०)
  • पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, इक्बाल स्टेडियम (१९९८)
  • न्यूझीलंड विरुद्ध भारत, कॅरिसब्रुक (१९९८)
  • अफगाणिस्तान वि न्यूझीलंड, ग्रेटर नोएडा (२०२४)