India vs Afghanistan T20 Series Updates : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना एमसीए स्टेडियम, मोहाली येथे संध्याकाळी सात वाजता सुरु होणार आहे. भारतीय संघाचे दोन मोठे खेळाडू, रोहित शर्मा आणि विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा या दोन खेळाडूंवर खिळल्या आहेत. मात्र, विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर राहणार आहे. आता अफगाणिस्तानने या दोन खेळाडूंसाठी खास योजना आखली आहे. ज्याचा खुलासा अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकाने केला आहे.

रोहित-विराटसाठी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आखल्या खास योजना –

अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट म्हणाले की, “आमचे गोलंदाज बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फलंदाजी पाहत आहेत. आमचे खेळाडूही आयपीएलमध्ये त्यांच्याविरुद्ध खेळतात. या दोन खेळाडूंना रोखण्यासाठी आमच्या गोलंदाजांनी योजनाही तयार केल्या आहेत. फक्त आमच्या गोलंदाजांना सामन्यात योग्य वेळी त्याचा अवलंब करायचा आहे. आता आम्ही खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” अफगाणिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले की, “भारतीय संघ खूप मजबूत आहे. तसेच जेव्हा रोहित आणि विराट संघात पुनरागमन करतात, तेव्हा हा संघ आणखी मजबूत होतो.”

विराट कोहली पहिला सामना खेळणार नाही –

रोहित शर्मा आणि विराट कोहली १४ महिन्यांनंतर टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन खेळाडूंच्या पुनरागमनाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. एकीकडे आज रोहित शर्माच्या टी-२० मध्ये पुनरागमनाची चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तसेच दुसरीकडे विराट कोहलीसाठी चाहत्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. विराट कोहली मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक दिवस आधी ही बातमी दिली होती.

हेही वाचा – Rahul Dravid Birthday : सर्वाधिक चेंडू खेळण्यापासून ते झेल घेण्यापर्यंत, राहुल द्रविडचे ‘हे’ चार विक्रम मोडणे कठीण

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, मुकेश कुमार

हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : विराट कोहली बाहेर झाल्याने कोणाचे नशीब उघडणार, प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा कोणाला देणार संधी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तान : हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान (कर्णधार), नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, अजमतुल्ला ओमरझाई, मुजीब-उर-रहमान, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, नूर अहमद/नवीन-उल-हक, फजलहक फारूकी