Shahid Afridi On Shoaib Akhtar: पाकिस्तानमध्ये सध्या कोणत्या प्रकारची आर्थिक स्थिती सुरू आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. दरम्यान, दोहा येथे खेळल्या जाणार्‍या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) २०२३ हंगामात खेळण्यासाठी पाकिस्तानी संघाचे अनेक माजी खेळाडूही तेथे पोहोचले आहेत. त्यात शोएब अख्तर, अब्दुल रज्जाक आणि मिसबाह-उल-हकसह पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचाही समावेश आहे, जो आशिया लायन्स संघाकडून खेळत आहे.

दोहा येथे सुरू असलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेटसाठी पाकिस्तानचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू कतारला गेले आहेत. मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि अब्दुल रझाक हे माजी स्टार खेळाडू आशिया लायन्सचे प्रतिनिधित्व करत आहेत. आशिया लायन्सची कमान शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. लायन्सने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे ज्यात त्यांना भारत महाराजाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आज आशिया लायन्सचा सामना जागतिक दिग्गजांशी होणार आहे. त्याआधी शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी त्याची खिल्ली उडवत आहे. व्हिडिओ एडिट न करण्याची धमकीही दिली.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

हेही वाचा: Shreyas Iyer:  “चहल भाईचे आता काही खरं नाही”, श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा दिसले एकाच हॉटेलच्या खोलीत, सोशल मीडियावर मीम्सचा उच्छाद

दरम्यान, शोएब अख्तरने आपल्या सहकारी खेळाडूंसोबतचा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीने त्याची खिल्ली उडवली आहे. यादरम्यान आफ्रिदीने शोएब अख्तरला पाकिस्तानचा पुढील अर्थमंत्री बनवण्याबाबतही बोलले. खरे तर अख्तरने अलीकडेच पाकिस्तानी संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझमवर निशाणा साधला होता आणि त्यावर आफ्रिदीने त्याचा पाय ओढला होता. पाकिस्तानचे विद्यमान अर्थमंत्री इश्क दार यांची जागा घेऊन शोएब अख्तरला ही जबाबदारी सोपवावी, असे मी म्हणत आहे, असे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, तो ब्रँड बनवण्यासाठी आला आहे आणि तो ब्रँड बनवणार आहे. आफ्रिदीने शोएबला ही गोष्ट एडिटमधून न काढण्याची धमकीही दिली होती.

हेही वाचा: Video: केकेआरच्या डॅशिंग ऑलराऊंडरची पत्नी आहे सोशल मीडिया क्वीन, एका पोस्टने बनली इंटरनेट सेन्सेशन

शोएब अख्तरने बाबरच्या इंग्रजी ज्ञानावर निशाणा साधला

शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमच्या इंग्रजी ज्ञानाबाबत नुकत्याच केलेल्या विधानात म्हटले आहे की, “त्याने त्यात सुधारणा करायला हवी जेणेकरून तो विराट कोहली, रोहित शर्मासारखा ब्रँड म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकेल.” शोएबच्या या वक्तव्यानंतर त्याला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. शोएबने त्यावेळी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, “क्रिकेट खेळणे आणि मीडियाशी बोलणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला नीट बोलता येत नसेल तर तुम्ही स्वतःला नीट व्यक्त करू शकणार नाही,” असे तो म्हणाले. हीच समस्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचीही आहे.