फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाचा संघ विजयी मार्गावर परतला आहे.अर्जेंटिनाने मेक्सिकोला २-० ने पराभूत करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या दरम्यान लिओनेल मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी ८८,९६६ प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. २८ वर्षांतील फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यात प्रेक्षकांची ही सर्वात मोठी संख्या आहे. फिफाच्या मते, दोहाच्या उत्तरेकडील लुसेल स्टेडियम, यूएस मध्ये १९९४ च्या फायनलनंतर विश्वचषक प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.

कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथील रोझ बाउल येथे नियमित वेळेत गोलविना बरोबरी झाल्यानंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलने इटलीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. हे पाहण्यासाठी त्यावेळी ९१,१९४ लोक उपस्थित होते.

शनिवारची उपस्थिती लुसेल स्टेडियमवरील मागील दोन सामन्यांपेक्षा शंभराहून अधिक होती. जेव्हा ब्राझीलने सर्बियाचा पराभव केला आणि अर्जेंटिना सौदी अरेबियाविरुद्ध हरले. कतारमधील उपस्थितीचे आकडे सर्वकालीन विश्वचषक सामन्यांसाठी शीर्ष ३० मध्ये देखील स्थान मिळवू शकत नाहीत. १९५० मध्ये रिओ दि जानेरो येथे उरुग्वेने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवला, तेव्हा माराकाना स्टेडियममध्ये १,७३,८५० लोक पस्थित होते, जे आतापर्यंतच्या विश्वचषकातील सर्वाधिक संख्या होती.

मेक्सिकोविरुद्ध मेस्सी जुन्या रंगात दिसला –

६४व्या मिनिटाला एंजल डी मारियाच्या पासवर लिओनेल मेस्सीने २५ यार्डच्या अंतरावरून गोल केला. संघासाठी दुसरा गोल बदली खेळाडू एन्झो फर्नांडिसने ८७व्या मिनिटाला केला. अर्जेंटिनाला पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. बुधवारी पोलंडविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एक विजय नोंदवावा लागेल.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: मेस्सी आणि फर्नांडिसच्या जादुई गोलमुळे अर्जेंटिनाच्या बाद फेरीतील आशा कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३५ वर्षीय मेस्सी कदाचित शेवटचा विश्वचषक खेळत आहे आणि ही एकमेव मोठी स्पर्धा आहे, जेथे त्याला विजेतेपद मिळवता आलेले नाही. मेस्सीचा विश्वचषकातील हा आठवा गोल आहे. त्याचा प्रतिस्पर्धी पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही विश्वचषकात केवळ आठ गोल केले आहेत. याचबरोबर अर्जेंटिनाचा महान खेळाडू दिएगो मॅराडोनाच्या नावावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तितक्याच गोलची नोंद आहे.