Shubman Gill Catch Video Viral: आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना खेळला जात आहे. या दोघांमधील गटातील सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि रोहित शर्माने शानदार सुरुवात केली. या सामन्यातील शुबमन गिलचा झेल सोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, पाकिस्तानचा संघ ट्रोल होत आहे.

नसीमच्या गोलंदाजीवर शुबमन गिलचा सोडला झेल –

नसीम शाहच्या गोलंदाजीवर भारतीय डावाच्या ८व्या षटकात शुबमन गिलचा स्लीपमध्ये झेल सोडला. इफ्तिकार अहमद चेंडूकडे फक्त बघत राहिला. त्यामुळे येणाऱ्या काळात हा झेल किती महाग पडतो पाकिस्तानला ते पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच आता या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शुबमन गिल आणि रोहित शर्माने झळकावले –

शुभमन गिलने ३७ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध ६७ धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचबरोबर १५ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता ११५ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडे क्रमवारीत ‘या’ संघाने हिरावला नंबर वनचा मुकुट

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध ७८ धावा करताच रोहित शर्मा करणार मोठा विक्रम, वनडे क्रिकेटमध्ये गाठणार ‘हा’ खास टप्पा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.