scorecardresearch

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या; हेझलवूडनंतर ‘हा’ खेळाडूही बाहेर होण्याची शक्यता, स्मिथने दिली माहिती

Border Gavaskar Trophy: वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड हे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. स्टीव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, ग्रीनही नागपूर कसोटीतून बाहेर असू शकतो.

IND vs AUS Test Series Cameron Green is also out of first test against
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ ( फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या नागपुरात होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पमधील जखमी खेळाडूंची संख्या वाढत आहे. स्टीव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल एक मोठे अपडेट दिली आहे. स्मिथने पुष्टी केली आहे की, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कॅमेरून ग्रीन खेळण्याची शक्यता नाही.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन बोटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत गोलंदाजी करणार नव्हता. त्यामुळे तो संघात फलंदाज म्हणून संघात सहभागी देणार होता. स्मिथने मंगळवारी (७ फेब्रुवारी) सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ग्रीनने नेटमध्ये वेगवान गोलंदाजांच्या एकाही चेंडूचा सामना केला नाही.

स्मिथने पत्रकार परिषदेत सांगितले की, “त्याने वेगवान गोलंदाजांचाही सामना केलेला नाही, त्यामुळे पहिल्या कसोटीत खेळण्याची त्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचबरोबर हेझलवूडची दुखापत ही आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. पण लान्स चांगला गोलंदाज आहे. बोलंडही चांगली कामगिरी करत आहे. त्याची नैसर्गिक लेंथ इथल्या खेळपट्ट्यांना साजेशी आहे. शोभेल. त्याचबरोबर लान्सचा वेग अधिक आहे.”

हेही वाचा – ICC Player of the Month नामांकन जाहीर; डेव्हॉन कॉन्वेसह ‘या’ दोन भारतीयांमध्ये चुरस, पाहा कोण आहेत

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:43 IST