भारताच्या अजय जयरामने आपली विजयी घोडदौड कायम राखत स्विस ग्रां प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आनंद पवारचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आल़े
जयरामने तिसऱ्या फेरीतील लढतीत तैपेईच्या त्झू वेई वांगवर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला़ ३५ मिनिटांच्या या लढतीत वांगने जयरामला कडवे आव्हान दिले, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ जयरामला पुढील सामन्यात सकाईशी दोन हात करावे लागतील़ दुसऱ्या लढतीत जपानच्या काझुमासा सकाईने पवारचा १९-२१, २१-१९, २१-१५ असा पराभव केला़
सायना दुसऱ्या स्थानी
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. पी. व्ही. सिंधू चौथ्या स्थानी स्थिर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2015 रोजी प्रकाशित
जयरामची आगेकूच, आनंद पराभूत
भारताच्या अजय जयरामने आपली विजयी घोडदौड कायम राखत स्विस ग्रां प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आनंद पवारचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आल़े
First published on: 13-03-2015 at 09:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay jayaram progress anand pawar loss