भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे लवकरच बापमाणूस बनणार आहे. अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपली पत्नी राधीका सोबत डोहाळेजेवणाचा मराठमोळ्या वेशातला फोटो अजिंक्यने शेअर केला आहे.
२६ नोव्हेंबर २०१४ साली अजिंक्य रहाणे आणि राधिका विवाहबंधनात अडकले. राधिका आणि अजिंक्य हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. कॉलेजमध्ये दोघांचीही प्रेमकहाणी फुलली, त्यानंतर या प्रेमकहाणीचं रुपांतर लग्नामध्ये झालं.
सोशल मीडियावर अजिंक्य आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्यांच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. प्रदीर्घ कालावधीनंतर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याची कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे.
