Akash Chopra’s Test team of the Year 2023 : माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने नवीन वर्षाच्या आधी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली आहे. त्याने आपल्या या संघात भारतातील चार खेळाडूंची निवड केली आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाचे दोन, इंग्लंडचे तीन आणि न्यूझीलंड आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक खेळाडू आपल्या संघात निवडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आकाश चोप्राने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघातून एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.

आकाश चोप्राने आपल्या कसोटी संघात उस्मान ख्वाजा आणि रोहित शर्मा यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. उस्मान ख्वाजा या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी खूप चांगला खेळला आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रोहित शर्माने २०२३ मध्ये ५४५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर आकाश चोप्राने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटची निवड केली आहे. यानंतर विराट कोहलीची चौथ्या क्रमांकावर तर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकची पाचव्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकीपटू म्हणून निवड –

बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमचाही आकाश चोप्राने त्याच्या यंदाच्या वर्षातील कसोटी संघात समावेश केला आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारताचे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली आहे. जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले होते. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आकाश चोप्राने न्यूझीलंडचा टिम साऊथी, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांची निवड केली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा – Year Ender 2023 : टीम इंडिया विश्वचषक विजेत्याला ऑस्ट्रेलियाला मागे टाकत ठरली अव्वल, २०२३ मध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

आकाश चोप्राची ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ :

रोहित शर्मा, उस्मान ख्वाजा, जो रूट, विराट कोहली, हॅरी ब्रूक, मुशफिकर रहीम, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट ब्रॉड, टिम साऊदी आणि मिचेल स्टार्क.