नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेतील (आयओए) अंतर्गत वादाची आता खुली चर्चा होऊ लागली आहे. कार्यकारी परिषदेचे सदस्य उघडपणे अध्यक्षांविरुद्ध कारवाया करत आहेत. अशा वेळी उद्विग्न झालेल्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी कार्यकारी परिषदेचे सदस्य मला कामच करू देत नसून प्रत्येक निर्णयात मला बाजूला ठेवण्याकडेच कल असतो, अशी खंत व्यक्त केली आहे.

गेल्याच आठवडय़ात कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी ‘अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी’ अशी नोटीस परस्पर काढल्याने हा वाद समोर आला. अध्यक्ष उषा यांनी नियुक्त केलेल्या दोन अधिकाऱ्यांसाठी ही सूचना होती.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
CSK vs KKR Live Cricket Score Updates in Marathi
IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

‘आयओए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या रघुराम अय्यर यांच्या हकालपट्टीवर कार्यकारी परिषदेच्या बहुतेक सर्व सदस्यांची स्वाक्षरी आहे. त्याचबरोबर अध्यक्षांचे कार्यकारी साहाय्यक अधिकारी अजय नारंग यांचीही कार्यकारी परिषदेने हकालपट्टी केली होती.

हेही वाचा >>>IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी

‘‘कर्मचाऱ्यांची नियुक्ती किंवा काढून टाकणे, तसेच ‘आयओए’चे दैनंदिन कामकाज पाहण्याचा अधिकार कार्यकारी परिषदेला नाही. अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्याचे अधिकार आम्ही वापरायचे की नाहीत?’’ असा प्रश्न उषा यांनी उपस्थित केला आहे.

‘आयओए’ कर्मचाऱ्यांना ऑलिम्पिक भवनात लावण्यात आलेल्या सर्व नोटिसा काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना माझे साहाय्यक कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फतच कामे करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात यातील कुठल्याही सूचनांचे पालन केले जात नाही, अशी खंतही उषा यांनी बोलून दाखवली.