दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमला आयपीएलमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातील ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शला दुखापतीमुळे यापुढे स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे पंजाबच्या संघापुढे अमलाचा उत्तम पर्याय उपलब्ध असून त्याला आगामी सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

‘आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. पंजाबच्या संघातून खेळण्याची संधी मला मिळणार आहे. मला कायम पाठिंबा देणाऱ्यांचे आभार,’ असे अमलाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या घडीला पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. अमलाच्या  येण्याने पंजाबची फलंदाजी बळकट होणार का, याची उत्सुकता आहे.