नव्या कर्णधाराविषयी लवकरच घोषणा; गांगुलीची ग्वाही

कर्णधार विराट कोहलीने कसोटी संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचा मी आदर करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी व्यक्त केली.

कोहलीने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या या निर्णयामागे ‘बीसीसीआय’ला कारणीभूत धरले जात आहे. त्यामुळे गांगुली कोहलीच्या निर्णयाविषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘कोहलीने भारताचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा ‘बीसीसीआय’ला आदर आहे. त्याला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा,’’ असे गांगुली म्हणाला. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता असली, तरी याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असेही गांगुलीने सांगितले. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. आता बुधवारपासून उभय संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येईल.