Anushaka Sharma Post on Virat Kohli Birthday: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज किंग कोहली आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटच्या वाढदिवशी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा कायमचं त्याला स्पेशल वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, त्यामुले विरूष्काचे चाहते अनु्ष्काच्या पोस्टची वाट पाहत होते. आता अनुष्काने पोस्ट करत सर्वांनाच सरप्राईज दिलं आहे. अनुष्का शर्माने वामिका आणि अकायबरोबचा विराटचा एक फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे.

अनुष्काने अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच त्याचा फोटो विराटच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. अनुष्काने विराट कोहलीच्या वाढदिवशी विराटचा वामिका आणि अकायबरोबरचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. विराटने अकायला उचलून घेतलं आहे तर वामिकााही उचलताना हा फोटो काढला आहे. अनुष्काने यावेळेस या फोटोला काही कॅप्शन न देता फक्त हार्ट आणि नजरवाला इमोजी टाकला आहे.

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीची संपत्ती किती? क्रिकेटव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत काय? एका सोशल मीडिया पोस्टसाठी घेतो तब्बल…

विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने टाकलेली पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे. एक म्हणजे विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काच्या पोस्टची सर्वांना प्रतिक्षा होती आणि दुसरं कारण म्हणजे या पोस्टमध्ये चाहत्यांना सरप्राईज मिळालं. चाहत्यांना वाटलं होतं की अनुष्का नेहमीप्रमाणे तिचा आणि विराटचा रोमँटिक फोटो शेअर करेल पण तिने दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत विराटला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

अनुष्काने विराट आणि वामिकाचा फोटो शेअर केला असला तरी तिने दोघांचे चेहरे मात्र इमोजीने लपवले आहेत. वडिलांची भूमिका पार पाडतानाचा विराट कोहलीचा हा फोटो खूपच छान दिसत आहे. चाहत्यांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ जानेवारी २०२१ रोजी वामिकाचा जन्म झाला तर मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा अकायचा जन्म झाला. अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आणि गरोदरपणात ती बहुतांश वेळ तिथेच राहिली. तर त्याच्या जन्मानंतरही विराट आणि अनुष्का लंडनमध्ये असतात. तेथील त्यांचे फोटो, व्हीडिओही पाहायला मिळतात.