Who is Saniya Chandhok Rumoured To get Engaged with Arjun Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. २५ वर्षीय अर्जुनचा साखरपुडा सानिया चंडोकशी झाला आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुनची साखरपुडा खाजगी समारंभात पार पडल्याची माहिती देखील समोर आली आहे. पण सानिया चंडोक नेमकी कोण आहे, जाणून घेऊया.

सानिया चंडोक ही अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत. या दोघांचा साखरपुडा खाजगी समारंभात पार पडला. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अर्जुन तेंडुलकरशी साखरपुडा झाल्याची चर्चा असणारी सानिया चंडोक आहे तरी कोण?

सानिया चंडोक ही मोठ्या प्रसिद्ध उद्योजक कुटुंबातील आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी असलेला आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे.

सानिया चंडोक हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय ती मिस्टर पॉजची संस्थापकदेखील आहे. सानिया ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये भागीदार आणि संचालक आहे.

अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून एकूण पाच सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३ धावा केल्या आहेत आणि तीन विकेट घेतल्या आहेत. अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने ९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या.

अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण अर्जुन तेंडुलकरला २०२५ च्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या फळीत फलंदाजीदेखील करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी सामने, १८ लिस्ट ए सामने आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत.