Arjun Tendulkar Shares Cryptic Post: सचिन तेंडुलकर आणि तेंडुलकर कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरचा धाकटा लेक अर्जुन तेंडुलकरने साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अर्जुनने मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याबरोबर साखरपुडा केल्याचं म्हटलं गेलं. पण दोन्ही कुटुंबियांनी याबाबत अधिकृत महािती दिली नाही. दरम्यान आता काही दिवसांनी अर्जुन तेंडुलकरने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
सानिया चंडोक ही अर्जुन तेंडुलकरची बालपणीची मैत्रिण असल्याचं म्हटलं जात आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा साखरपुडा खाजगी समारंभात पार पडल्याचं म्हटलं जात आहे, जिथे दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र परिवार उपस्थित होता. दरम्यान तेंडुलकर किंवा घई कुटुंबियांपैकी कोणीही याबाबत अधिकृच माहिती दिली नाही. पण यादरम्यान सानिया चंडोक तेंडुलकर कुटुंबानंतर सातत्याने घरातील कार्यक्रमांना दिसली आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या क्रिप्टिक पोस्टने वेधलं लक्ष
अर्जुन तेंडुलकर हा वडिलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धांमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.
अर्जुन तेंडुलकर हा सोशल मीडियावर फार कमी सक्रिय असतो. फार कमी वेळेस तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करतो किंवा स्टोरी शेअर करतो. आज म्हणजेच ९ सप्टेंबरला त्याने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तो डोंगरावरून आजूबाजूचा परिसर पाहतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आणि त्यावरील कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अर्जुन तेंडुलकरने शेअर केलेल्या फोटोवर इंग्रजीत एक कोट लिहिला आहे, In the middle of nowhere and i am heading into nowhere… अर्जुन शून्यात कुठेतरी पाहत असल्यासारखा फोटो टाकला आहे. या त्याच्या पोस्टने त्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सानिया चंडोक अनेकदा तेंडुलकर कुटुंबासह दिसली आहे. साखरपुड्याच्या चर्चांनंतर सारा तेंडुलकरच्या पिलाटेस अदाकमीच्या उद्घाटनाला सानिया उपस्थित होती. सचिन, अंजली, सारा, सानिया आणि साराची आजी अशा सर्वांनी उद्घाटनाची रिबिन कापली होती. यानंतर सचिनच्या आईच्या वाढदिवसाला पहिल्यांदाच सारा आणि अर्जुन एकत्र दिसले होते. याशिवाय तेंडुलकर कुटुंबाच्या महेश्वर ट्रिपला देखील सानिया चंडोक उपस्थित होते. याचे फोटो स्वत: सचिन तेंडुलकरने शेअर केले आहेत.