Aryna Sabalenka Champagne Celebration Video: टेनिसपटू सबालेन्काने सलग दुसऱ्यांना युएस ओपनचं जेतेपद पटकावलं आहे. वर्ल्ड नंबर वन खेळाडू असलेल्या सबालेन्काने अंतिम सामन्यात एनिसोवाचा ६-३, ७-६(३) ने पराभव केला आहे. हे तिच्या टेनिस कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम आहे. या विजयानंतर सबालेन्काने तिच्या टीमसह जबरदस्त सेलिब्रेशन केलं. या शॅम्पेन सेलिब्रेशनचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
२०१४ मध्ये सेरेना विल्यम्सनंतर फ्लशिंग मीडोजमध्ये एकेरीचे विजेतेपद काय ठेवणारी सबालेन्का ही पहिली महिला ठरली. अनिसिमोवा तिच्या सलग दुसऱ्या ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळत होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये पाच सर्व्हिस ब्रेक झाले, ज्यामध्ये सबालेन्काने अखेर आघाडी घेतली. तिने तिसऱ्यांदा अनिसिमोवाची सर्व्हिस ब्रेक केली आणि ५-३ अशी आघाडी घेतली. काही मिनिटांनंतर, अनिसिमोवाने सेट जिंकला.
२७ वर्षीय सबालेन्काने आतापर्यंत चार ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत, ज्यात २ ऑस्ट्रेलियन ओपन आणि २ यूएस ओपनचा समावेश आहे. तिने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२४ आणि २०२५ मध्ये यूएस ओपनचे जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सबालेन्काने तिच्या १९ सामन्यांपैकी १७ विजेतेपदे जिंकली आहेत. २०२५ च्या यूएस ओपनमध्ये अमांडा अनिसिमोव्हाला पराभूत करून सबालेन्काने सलग दुसरे विजेतेपद जिंकले, २०१२-२०१४ मध्ये सेरेना विल्यम्सनंतर अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरली.
जेतेपदानंतर विजयाचं सेलिब्रेशन पाहिलंय का? सबालेन्का आणि टीमने पाहा काय केलं?
सबालेन्काने विजयानंतर चंदेरी रंगाचं जॅकेट घातलं जे ट्रॉफीच्या रंगासारखं होतं. यानंतर सबालेन्का तिच्या टीमसह शॅम्पेन सेलिब्रेशन करण्यासाठी पोहोचली. लॉकर रूममध्ये तिच्या टीमने आधीच प्लास्टिक लावून ती जागा तयार करून ठेवली आहे. टीममधील प्रत्येकाच्या हातात शॅम्पेनची बॉटल होती. सबालेन्कादेखील येताना शॅम्पेनची बॉटल घेऊन आतमध्ये आली आणि शॅम्पेन उडवायला सुरूवात केली.
लॉकर रूममध्ये आधीच तिची टीम शॅम्पेनसह सज्ज होती. त्यांनीही सबालेन्का आतमध्ये येताच शॅम्पेन उडवायला सुरूवात केली. सबालेन्काच्या चेहऱ्यावर शॅम्पेन उडताच ती बाहेर गेली आणि नंतर पुन्हा आत येत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली. युएस ओपनच्या ट्रॉफीमध्ये देखील तिच्या टीमने शॅम्पेन ओतून पिताना दिसले. सबालेन्काच्या विजयानंतर सेलिब्रेशनचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.