scorecardresearch

Premium

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

Ashwin Batting Practice Video: मोहालीतील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यातील विजयानंतर लगेचच अश्विनचा फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Ashwin batting practice video Viral
अश्विनचा फलंदाजीचा सराव करताना (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ashwin starting batting practice went viral: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला २२ सप्टेंबरपासून मोहालीच्या मैदानावर सुरुवात झाली. टीम इंडियाने पहिला सामना ५ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जवळपास २१ महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करणारा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली. या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रात्री उशिरा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

रविचंद्रन अश्विन अनेकदा मैदानावर काहीतरी वेगळे करण्यासाठी ओळखला जातो. आता ही त्याने असेच काहीसे केले आहे. सामना संपताच त्याने पॅड घातले आणि थेट मैदानाच्या मधल्या खेळपट्टीवर सरावासाठी गेला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षक राहुल द्रविड देखील होते, ज्यांनी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली. अश्विनचे ​​हे पाऊल पाहून त्यावेळी उपस्थित ब्रॉडकास्टिंग टीममधील माजी खेळाडू अभिषेक नायर आणि मार्क वॉ यांना आश्चर्य वाटले, पण त्यांनीही त्याचे कौतुक केले.

Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”
Pat Cummins Reaction After Defeat
IND vs AUS : ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे…’; भारताविरुद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्स असं का म्हणाला? जाणून घ्या
IND vs AUS 1st ODI Updates
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम
IND vs AUS 1st ODI Match Updates
IND vs AUS 1st ODI: मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का! मिचेल मार्शला धाडले तंबूत, पाहा VIDEO

एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अश्विनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने १० षटकात ४७ धावा देत मार्नस लाबुशेनच्या रूपात एक विकेट घेतली.

हेही वाचा – आयसीसीने T20 World Cup स्पर्धेची ठिकाणं केली जाहीर, १० मैदानांवर खेळवले जाणार ५५ सामने

जर अक्षर तंदुरुस्त नसेल तर अश्विनला विश्वचषकासाठी मिळू शकते संधी –

आशिया चषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन वनडेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. जर अक्षर विश्वचषकासाठी तंदुरुस्त नसेल, तर अश्विनकडे त्याचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. खालच्या फळीतील फलंदाज म्हणूनही अश्विन संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. विश्वचषकासाठी जाहीर केलेला संघ २८ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय बदलता येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: As soon as the first odi against australia ended the video of r ashwin starting batting practice went viral vbm

First published on: 23-09-2023 at 11:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×