आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात डळमळीत सुरूवात झाल्यानंतर फवाद आलम, मिसबाह उल हक आणि उमर अकमल यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने विजयासाठी श्रीलंकेसमोर २६१ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने आतापर्यंत १३ षटकांत  दोन गडी गमावून ६८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या सईद अजमलने परेरा आणि संगाकाराला बाद करत पाकिस्तानला यश मिळवून दिले आहे.