Team India Squad Asia Cup 2023: अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची बांधणी करण्यात आली आहे. BCCI ने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती सिद्ध झाल्याने बुमराहने आशिया चषकाच्या संघात स्वतःची जागा निश्चित केली आहे. याशिवाय संघात कोणाचा समावेश असेल याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

आशिया चषक २०२३ भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार),

हार्दिक पंड्या (उप कर्णधार)

शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज प्रसीध कृष्ण

राखीव खेळाडू: संजू सॅमसन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संघ निवडीनंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत निवडीच्या बाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. युझवेन्द्र चहलला डच्चू देण्याबाबत रोहितने सांगितले की, एकाच वेळी दोन रिस्ट स्पिनर्सची आवश्यकता नव्हती आणि समीकरण पाहिल्यास सध्या कुलदीप चहलच्या पुढे आहे त्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले. ” दुसरीकडे रोहितने बुमराहकडून काय अपेक्षा असतील यावर भाष्य करणे टाळले.