Shoaib Akhtar On Pakistan Captain: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. पाकिस्तानने चांगली कामगिरी केली, तर तो कौतुक केली करतो. पण कौतुक करण्याची संधी त्याला खूप कमी वेळेस मिळते. मात्र, चुकीचे निर्णय घेतले, तर तो जोरदार टीका देखील करतो. रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. दरम्यान या सामन्याच्या सुरूवातीलाच पाकिस्तानच्या कर्णधाराने चूकीचा निर्णय घेतला होता. यावरून शोएब अख्तरने पाकिस्तानच्या कर्णधाराच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्या खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच खेळपट्टीवर पाकिस्तानच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणं हे सर्वांना आश्चर्याचकीत करणारं होतं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२७ धावा करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १६ व्या षटकात ३ गडी राखून विजयाची नोंद केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ आणि अक्षर पटेलने २ गडी बाद केले. भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगलाच फायदा घेतला. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांना याचा फायदा करून घेता आला नाही. त्यामुळे शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली.

शोएब अख्तर टेपमेडच्या एका व्हिडीओमध्ये म्हणाला की, “त्यांना शुभेच्छा, सूर्यकुमार यादवने आधीच पिच रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, नंतर ड्यू येणार आहे. आमचा फलंदाजीक्रम मोठा असल्याने आम्हाला आधी गोलंदाजी करायची होती. पण आमचा आइन्स्टाईन म्हणाला, आम्हाला फलंदाजी करायची आहे.”

पाकिस्तानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. पाकिस्तानला सुरूवातीला मोठे धक्के बसले. शेवटी पाकिस्तानला २० षटकांअखेर १२७ धावा करता आल्या. पण ही धावसंख्या सामना जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. भारतीय संघाने दिलेलं आव्हान सहज पूर्ण केलं. भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.