Asia Cup 2022 IND vs HKG: भारताने बुधवारी हाँगकाँगविरुद्ध सामन्यात विजय प्राप्त करत अव्व्ल चारमध्ये स्थान मिळवले. सूर्यकुमार यादव (नाबाद ६८ धावा) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सामन्यात हाँगकाँगवर ४० धावांनी मात केली. मागील काही काळापासून कोहलीच्या बॅटला लागलेला दुष्काळ या हॉंगकॉंगच्या सामन्यानंतर दूर झाल्याचे म्हणत अनेकांनी कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये स्वतः विरोधी संघ हाँगकाँगने सुद्धा विराटला खास गिफ्ट देऊन अभिनंदन केले आहे. हॉंगकॉंग संघाचे हे प्रेम पाहून विराट सुद्धा भावुक झाला.

विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर करून हॉंगकॉंग क्रिकेट संघाचे खास आभार मानले. आशिया चषकातील सामन्यात भारताने परभाव केल्यावर हाँगकाँगच्या संघाने आपल्या सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असणारी एक संघांची जर्सी कोहलीला भेट दिली यावर एक अत्यंत खास संदेश लिहिला होता. “विराट, एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. पुढे अनेक अविश्वसनीय दिवस आहेत. तुला खूप सारे प्रेम व आदर, टीम हाँगकाँग” असे या जर्सीवर लिहिलेले दिसते”

विराटने हा फोटो शेअर करताना हॉंगकॉंगच्या संघाचे हे गिफ्ट अगदी गोड आहे व याने आपल्याला खूपच आनंद झाला असे कॅप्शन लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा विराट कोहली इंस्टाग्राम स्टोरी

(फोटो: विराट कोहली इंस्टाग्राम)

हाँगकाँग विरुद्ध सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने ४४ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांसह ५९* धावा केल्या. आजवरच्या १०१ टी- २० सामन्यांमध्ये, विराटने ५०. ७७ च्या सरासरीने ३, ४०२ धावा केल्या आहेत. यात ३१ अर्धशतके असून विराटचा स्ट्राइक रेट १३७. १२ आहे.