scorecardresearch

Premium

Asian Games 2023: देशासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या रमिताने सांगितले तिच्या यशामागील गुपित; म्हणाली, “नियमित आहार उपयोगाचा नसतो…”

Asian Games 2023, Ramita Jindal: रमिता ही भारतीय महिला संघाची सदस्य होती जिने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले आणि वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले. दरम्यान तिने तिच्या यशामागील गुपित उलगडले आहे.

Ramita who won her first medal for the country in Asian Games shares the secret behind her success said Regular diet and exercise is necessary
रमिता ही भारतीय महिला संघाची सदस्य होती जिने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले आणि वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games 2023, Ramita Jindal: चविष्ट पूरक आहार, प्राणायाम आणि योगासने हे कोणत्याही किशोरवयीन व्यक्तीला रोज करायला आवडेल असे नाही, परंतु येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नेमबाज रमिता जिंदालचा हा दिनक्रम होता. रमिता ही भारतीय महिला नेमबाज संघाची सदस्य आहे जिने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले आणि वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले. मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यापासून ती आणि दिव्यांश पनवार कमी फरकाने हुकले.

हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा शहरातील रहिवासी असलेल्या रमिता म्हणाली, “मी मानसशास्त्रज्ञ गायत्री वर्तक यांच्याशी सल्लामसलत केली, त्यांनी मला हे सर्व तंदुरुस्तीबाबतचे तंत्र सांगितले. मी सकाळी प्राणायाम आणि योगासने करते. हे मन आणि मेंदू शांत राहण्यास मदत करते. शरीरासाठी खुराक देखील महत्वाचा आहे आणि तो कुठल्या प्रकारचा असावा यासाठी माझ्याकडे तज्ञ देखील आहेत. त्यांनी मला पूरक आहार कोणता आहे, हे सांगितले. मी शाकाहारी असल्याने, मी सर्व पूरक आहार घेते ज्याची चव खूप वाईट आहे. पण आपण काय करू शकतो? मला तासनतास उभे शुटिंगसाठी पोडीयमवर उभे राहावे लागते.”

Asian games 2023: Indian archers target gold in Asian Games Brilliant performance by Jyoti Aditi and Praneet
Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी
Asian Games: Proud performance by Indian women Parul-Preeti win two medals in 3000m steeplechase
Asian Games: म्हारी छोरी छोरोसे…! भारतीय महिलांची अभिमानस्पद कामगिरी, ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत पारुल-प्रीतीने जिंकली दोन पदके
Rohan Bopanna and Rutuja Bhosle win gold in 19th Asian Games 2023
Asian Games: रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने रचला इतिहास, टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी जिंकले सुवर्णपदक
Asian games 2022 Updates
Asian Games: भारताला सहाव्या दिवशी नेमबाजीत दोन सुवर्णांसह मिळाली पाच पदकं, ऐश्वर्य प्रताप सिंगने पटकावले रौप्यपदक

हेही वाचा: World Cup 2023 Pune: ढोल ताशांच्या गजरात ‘विश्वचषक ट्रॉफी’ पुण्यात पोहोचली, सेनापती बापट रोडवरुन भव्य मिरवणूक; चाहत्यांची अलोट गर्दी

रमिताचे वडील अरविंद तिला २०१७ मध्ये शूटिंग रेंजवर घेऊन गेले आणि जेव्हा तिने पहिल्यांदा हा खेळला तेव्हा तिला खूप आवडला. त्यावेळी ती १३ वर्षांची होती आणि आठवीत शिकत होती. ती म्हणाली, “मी करण शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि खेळाला करिअर करण्याचा विचार केला. त्यावेळी मला तेथील सर सांगत होते की, नियमित आहार उपयोगाचा नसतो नुसता तर सराव देखील खूप गरजेचा आहे. यामुळे मी दोन्ही गोष्टी कशा संतुलित राहतील यावर लक्ष केंद्रित केले.”

वकील असण्याबरोबरच, रमिताचे वडील कुरुक्षेत्रात आयकर सल्लागार देखील आहेत, त्यामुळे त्यांना कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला नाही. ती म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला कधीही काहीही करण्यात नकार दिला नाही. मला रायफल हवी असेल तर लगेच त्यांनी दिली, नवीन किट आणली. खर्च कमी करत असतानाही त्यांनी मला कोणतीही अडचण जाणवू दिली नाही.”

हेही वाचा: IND vs AUS: तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया पोहोचली राजकोटला; ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज, पाहा Video

दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये बी. कॉमची विद्यार्थिनी असलेल्या रमिता हिला तिच्या संस्थेने स्पर्धेदरम्यान वर्गात क्लास न करण्याची सूट दिली आहे. ती म्हणाली, “मला इथे अभ्यास करायला वेळ मिळत नाही पण मी बाहेरच्या स्पर्धा आणि विश्रांतीच्या वेळी अभ्यास करते. मी कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही आणि याबाबतीत कॉलेजकडून पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. मला मित्रांकडून नोट्स मिळतात आणि युट्युबचीही खूप मदत होते.

रमिता म्हणाली की, “ऑलिम्पिकमध्ये एकाही भारतीय महिलेने पदक जिंकले नाही आणि पुढील वर्षी पॅरिसमध्ये ही कमतरता भरून काढण्याचे माझे ध्येय आहे.” ती पुढे म्हणाली, “अभिनव सर हे प्रत्येक नेमबाजाचे प्रेरणास्थान आहेत. तिच्याप्रमाणे मलाही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचे आहे, जे आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला नेमबाजाने जिंकलेले नाही. मी नुकतेच वरिष्ठ संघाबरोबर खेळायला सुरुवात केली आहे. आता माझे लक्ष हे पॅरिस ऑलिम्पिक संघात स्थान मिळवणे हे आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2023 ramita who won the first medal for the country told the secret of success tasteless supplements yoga and pranayama avw

First published on: 26-09-2023 at 18:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×