scorecardresearch

Premium

Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी

Asian games 2023: गतविजेत्या आणि अव्वल मानांकित ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर या त्रिकुटाने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी शेवटच्या फेरीत ६० पैकी ६० गुण मिळवले.

Asian games 2023: Indian archers target gold in Asian Games Brilliant performance by Jyoti Aditi and Praneet
भारताच्या महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सौजन्य- (ट्वीटर)

Asian games 2023: भारताच्या महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा २३०-२२९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. यासह भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारतीय महिला तिरंदाजी संघाने रोमहर्षक फायनलमध्ये तैवानचा अवघ्या एका गुणाने पराभव केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले.

गतविजेत्या आणि अव्वल मानांकित ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर या त्रिकुटाने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्यांनी शेवटच्या फेरीत ६० पैकी अचूक ६० गुण मिळवले आणि २३०-२२९च्या अंतिम स्कोअरसह तिसऱ्या सीडेड तैवान संघाला थोड्या फरकाने पराभूत करण्यात यश मिळविले. या विजयामुळे तिरंदाजीतील त्याचे हे पाचवे पदक निश्चित झाले.

pramod bhagat
जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा: यथिराज, प्रमोद, कृष्णाचा अंतिम फेरीत प्रवेश
badminton india team
अंतिम लढतीत थायलंडवर मात, अनमोलचा पुन्हा निर्णायक विजय
badminton asia team championships indian women enter maiden final after beating japan
आशिया सांघिक बॅडिमटन स्पर्धा: भारतीय महिलांची अनमोल कामगिरी, जपानवर मात करत अंतिम फेरीत धडक
Nasir Hussain opinion on India England second test match sport news
बुमराची जादूई कामगिरी दोन संघांतील फरक! भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत नासिर हुसेनचे मत

ज्योती आणि ओजस देवतळे यांच्या कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत विजयानंतर २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यासह भारताच्या तिरंदाजांनी पाच पदके मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले अस्तित्व मजबूत केले आहे. भारतीय तिरंदाजांनी इंचॉन २०१४ मधील त्यांच्या मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे, जिथे त्यांनी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले होते.

ओजस देवतळे आणि वर्मा यांची कामगिरी विशेष आहे, त्यांनी पुरुषांच्या कंपाउंड वैयक्तिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठून किमान दोन पदके निश्चित केली आहेत. याशिवाय ज्योतीने महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक अंतिम फेरीत भारतासाठी किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. मागील सामन्यात, भारतीय संघाने त्यांच्या चौथ्या मानांकित प्रतिस्पर्ध्यांचा २३३-२१९ गुणांसह आरामात पराभव करत चायनीज तैपेईविरुद्ध सुवर्णपदकाची लढत निश्चित केली.

उपांत्यपूर्व फेरीत, अव्वल मानांकित भारतीय त्रिकुटाने हाँगकाँगचा २३१-२२० गुणांसह पराभव केला. रतिह जिलिजाती फादली, सयाहारा खोएरुनिसा आणि श्री रांटी यांचा समावेश असलेल्या इंडोनेशियाने मजबूत कझाकिस्तान संघाविरुद्ध २३२-२२९ अशा कमी फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा: IND vs China, Hockey: महिला हॉकी संघाचे सुवर्णपदक हुकले! एशियन गेम्समध्ये उपांत्य फेरीत चीनकडून ०-४ने दारूण पराभव

सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, भारतीय संघाने दडपण जाणवू दिले नाही आणि भात्यातील सहा बाणांच्या पहिल्या सेटमध्ये सर्व १० लक्ष्ये अचूक ठिकाणी मारून चांगली सुरुवात केली. याउलट, कझाकस्तानच्या तिरंदाजांनी खेळी केली आणि ५१ गुण मिळवले, ज्यामुळे भारताला नऊ गुणांची मजबूत आघाडी घेण्यात मदत झाली. यानंतर इंडोनेशियन संघाला पुनरागमन करता आले नाही. या रोमहर्षक सामन्यात भारताने १४ गुणांनी महत्त्वपूर्ण विजय संपादन केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games jyoti aditi and preneet won gold best performance by indian archers in asian games avw

First published on: 05-10-2023 at 17:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×