भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध दमदार खेळी करण्याबरोबरच एक मोठा खुसाला दिवाळी पाडव्याच्या दिवाशी केला. राहुलने स्कॉटिश गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. विशेष म्हणजेच के. एल. राहुलचा हा सामना त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने प्रत्यक्षात मैदानात उपस्थित राहून पाहिला. या सामन्यानंतर के. एल. राहुलने अथियासोबतचं नातं पहिल्यांदाच सार्वजनिकपणे मान्य करत एक पोस्ट केली. अथियाचा वाढदिवस ५ नोव्हेंबर रोजी असतो त्यामुळे के. एल. राहुलने ही खेळी अथियाला भेट केली. मात्र त्याचवेळी त्याने अथियाला माय लव्ह म्हणत सार्वजननिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

राहुलने सामन्यानंतर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली. राहुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अथियासोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये अथियासोबतचे नाते जगासमोर आणले. गेल्या काही दिवसांपासून अथिया राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांचा इंग्लंडमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. पण त्या दोघांनीही अद्याप उघडपणे यावर वक्तव्य केलेले नव्हते. पण आता राहुलने अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याने अथियासोबतचे दोन फोटो पोस्ट करत, “हॅपी बर्थ डे माय लव्ह,” असं म्हटलं आहे.

या फोटोवर अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, अनुष्का शर्मा, शीतल रॉबिन उथप्पा यासारख्या व्यक्तींचा समावेश आहे. पण विशेष म्हणजे या फोटोवर बर्थ डे गर्ल असणाऱ्या अथियानेही कमेंट केलीय. अथियाने इमोजी वापरत कमेंट केली असून व्हाइट हार्ट आणि पृथ्वीचा इमोजी वापरला आहे. यामधून तिला प्रेम आणि तूच माझं जग आहेस असं सूचित करायचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.