Australia vs Pakistan 2nd Test Series: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात मंगळवारी २६ डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे दुसरी कसोटी सुरू होईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. एक दिवस आधी, ख्रिसमसच्या दिवशी, पाकिस्तानी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी ‘ख्रिसमस गिफ्ट’ दिले. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू हे नेटमध्ये सराव करत होते. पाकिस्तानचे खेळाडू आणि इतर सदस्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू दिल्या.

आज, नाताळकहा सण हा प्रत्येक देशात साजरा केला जात आहे, क्रिकेटपटू देखील याला अपवाद नाहीत. ते भारतीय क्रिकेटपटू किंवा पाकिस्तानी क्रिकेटपटू असोत, सर्वजण हा उत्सव त्यांच्या संघाबरोबर साजरा करीत आहेत. पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी एक दिवस आधी, खेळाडूंनी इनडोअर नेटवर सराव केला. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पाकिस्तानी खेळाडू ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटवस्तू देत आहेत. व्हिडीओमध्ये, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स देखील यावेळी तिथे उपस्थित होता.

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी दुसरी कसोटी महत्त्वाची आहे कारण, ते पहिली कसोटी गमावल्यामुळे ०-१ने मागे आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३६० धावांनी मोठा विजय नोंदवला होता. पर्थ मधील कसोटीत पाकिस्तानची फलंदाजी अतिशय खराब होती. पहिल्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ २७१ धावांवर बाद झाला आणि दुसर्‍या डावात केवळ ८९ धावाचं करू शकला.

हेही वाचा: IND vs SA: पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी? के.एल. राहुल की के.एस. भरत, जाणून घ्या

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काळ्या हाताची पट्टी घातल्याबद्दल आयसीसीने फटकारलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याने, वैयक्तिक दु:खामुळे असे केल्याचे आयसीसीला सांगितल्यानंतर आपण याला आव्हान देणार असल्याचे शुक्रवारी सांगितले. १३ डिसेंबर रोजी जेव्हा ख्वाजा सराव सत्रासाठी बाहेर आला तेव्हा त्याच्या बुटांवर ‘ऑल लाईव्ह्स इक्वल’ आणि ‘फ्रीडम इज अ ह्युमन राइट’ असे लिहिले होते.

आयसीसीच्या नियमांनुसार क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान कोणताही राजकीय, धार्मिक किंवा वर्णद्वेषी संदेश दाखवू शकत नाहीत. मात्र माजी खेळाडू, कुटुंबातील सदस्य किंवा कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पूर्वपरवानगी घेऊन काळी पट्टी बांधता येते. पाकिस्तानमध्ये जन्मलेला उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटर आहे.

हेही वाचा: Champions Trophy 2025: BCCIची अट पाकिस्तान मान्य करणार? टीम इंडिया युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळू शकते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिच स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.