AUS vs SA, WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलाच सूर गवसला. कर्णधार टेंबा बावुमाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दरम्यान पॅट कमिन्सने त्याला बाद करत माघारी धाडलं.
या सामन्यातील दुसऱ्या दिवसातील पहिला सेशन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला. टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. त्याची अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची विकेट मिळवली. टेंबा बावुमाला माघारी धाडण्यासाठी मार्नस लाबुशेनने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ४० वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू कमिन्सने ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर बावुमाने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. कव्हर्सला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्नस लाबुशेनने डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. त्यामुळे टेंबा बावुमाला ३६ धावांवर माघारी परतावं लागलं. बावुमा आणि बेडिंघमने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेला सामन्यात कमबॅक करून दिलं.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव १३८ धावांवर आटोपला.
या सामन्यातील दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २१२ धावांवर आटोपला. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेलाही सुरूवातीला मोठे धक्के बसले. सलामीला आलेला एडन मार्करम शून्यावर माघारी परतला. तर रायन रिकल्टनने १६ धावा केल्या. मुल्डरने ६, टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली. तर स्टब्स २, का वेरीन ३९ धावांवर माघारी परतला. तर मार्को यान्सेनला खातंही उघडता आलं नाही.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिलं. कमिन्सने या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह इंग्लंडचा संपूर्ण डाव १३८ धावांवर आटोपला.