scorecardresearch

Premium

WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

India vs Australia, WTC 2023 final Updates: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा केल्या आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एक मोठा विक्रम केला.

India vs Australia WTC Final Updatesट्रॅव्हिस हेडचे
ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ (फोटो-ट्विटर)

Australia make history in WTC final: ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अप्रतिम खेळी खेळली. या दोघांनी शतके ठोकून ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. त्याचबरोबर या दोन्ही फलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड पहिला फलंदाज ठरला. त्याने १७४ चेंडूत १६३ धावा केल्या. त्याने पहिल्याच दिवशी शतक झळकावून हा कारनामा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने आपले शतक पूर्ण केले. तो २६८ चेंडूत १२१ धावा करून बाद झाला. तो डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. याआधी २०२१ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल झाली, तेव्हा एकही शतक झळकावले गेले नव्हते.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

ऑस्ट्रेलिया संघाने रचला इतिहास –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात आता ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ बनला आहे, ज्याच्या दोन फलंदाजांनी अंतिम सामन्यात शतक ठोकले आहे. हा एक मोठा पराक्रम आहे, जो तोडणे सोपे नाही. एवढेच नाही तर शतके झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने फायनलमध्ये २०० हून अधिक धावांची भागीदारीही केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने नोंदवला विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला सातवा भारतीय

भारतीय संघाचा पहिला डाव –

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून १५१ धावा केल्या आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावा आणि श्रीकर भरत पाच धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. म्हणजेच भारतीय संघ अजूनही आपल्या धावसंख्येने ३१८ धावांनी मागे आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने १२१ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली. अॅलेक्स कॅरीने ४८ आणि डेव्हिड वॉर्नरने ४३ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क धावबाद झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australia create history as travis head and steve smith hit centuries in wtc final 2023 vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×