Ajinkya Rahane Completes 100 Catches in Test Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक खास कामगिरी केली. त्याने कसोटी कारकिर्दीतील १०० झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. रहाणे कसोटी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट गमावून १५१ धावा केल्या आहेत.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑलआऊट होईपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४६९ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पॅट कमिन्स आणि बोलंड यांच्या रूपाने संघाची शेवटची जोडी मैदानात होती. सिराजच्या चेंडूवर कमिन्सने फटका खेळला, चेंडू रहाणेकडे पोहोचला. त्याने कोणतीही चूक न करता हा झेल घेतला. अशात कमिन्स बाद झाला. तो बाद होताच रहाणेने झेलचे शतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५८ कसोटी डावांमध्ये १०० झेल घेतले आहेत. यादरम्यान एका डावात सर्वाधिक ५ झेल घेतले आहेत.




सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत अजिंक्य ७ व्या क्रमांकावर –
भारताकडून कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने १६३ सामन्यात २०९ झेल घेतले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३४ सामन्यात १३५ झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०० सामन्यांमध्ये ११५ झेल घेतले आहेत. विराट कोहली १०९ झेलांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रहाणे कसोटी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे
उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने १५१ धावसंख्येवर ५ विकेट गमावल्या आहेत. भारताकडून अजिंक्य रहाणे २९ धावा करून नाबाद आहे. श्रीकर भरतने ५ धावा केल्या आहेत.