वृत्तसंस्था, मेलबर्न

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी फारसे धक्कादायक निकाल पाहायला मिळाले नसले, तरी बिगरमानांकित खेळाडूंनी तारांकित खेळाडूंना विजयांसाठी झुंजवले. रविवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यांत पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह आणि १२वा मानांकित टेलर फ्रिट्झ यांना पाच सेट, तर अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचला विजय मिळवण्यासाठी चार सेट संघर्ष करावा लागला.

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

यंदाच्या स्पर्धेत रुब्लेव्हकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, पहिल्या फेरीच्या लढतीत ब्राझीलच्या बिगरमानांकित थिआगो सेबोथ वाइल्डने रुब्लेव्हला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. रुब्लेव्हने पहिले दोन सेट जिंकल्यानंतर थिआगोने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन सेट आपल्या नावे केले. मात्र, निर्णायक पाचव्या सेटच्या टायब्रेकरमध्ये रुब्लेव्हला पुन्हा आपला खेळ उंचावण्यात यश आले. रुब्लेव्हने या सामन्यात ७-५, ६-४, ३-६, ४-६, ७-६ (१०-६) अशी बाजी मारली.

हेही वाचा >>>IND vs AFG 2nd T20 : विजयानंतर रोहित-विराटने घेतली शिवम दुबेची मजा, VIDEO होतोय व्हायरल

१२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रिट्झलाही पहिल्या फेरीचा सामना जिंकण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. परंतु मोक्याच्या क्षणी त्याने सर्वोत्तम खेळ केला. फ्रिट्झने अर्जेटिनाच्या बिगरमानांकित फाकुंडो डियाझ अकोस्टाला ४-६, ६-३, ३-६, ६-२, ६-४ असे पराभूत केले.

विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेला जोकोविच सामन्यांमध्ये धिम्या सुरुवातीनंतरही दमदार पुनरागमन करून विजय मिळवण्यासाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यातही हेच दिसून आले. क्रोएशियाच्या बिगरमानांकित डिनो प्रिझमिचने जोकोविचला चांगला लढा दिला. परंतु अपेक्षेप्रमाणे जोकोविचला विजय मिळवण्यात यश आलेच. त्याने हा सामना ६-२, ६-७ (५-७), ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकला.

२२व्या मानांकित अर्जेटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुंडोलोलाही पाच सेट झुंजावे लागले. त्याने बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या डेन स्वीनीचा ३-६, ६-३, ६-४, २-६, ६-२ असा पराभव केला. चौथ्या मानांकित यानिक सिन्नेरला मात्र फारसा संघर्ष करावा लागला नाही. त्याने नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डे झँडशूल्पला ६-४, ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवले.

हेही वाचा >>>IND vs AFG : १४ महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या विराटबरोबर चाहत्याने केलं असं काही की…, PHOTO होतोय व्हायरल

महिलांमध्ये बिगरमानांकित कॅरोलिना वोझनियाकी आणि अमांडा अ‍ॅनिसिमोव्हा यांना मानांकित खेळाडूंवर विजय मिळवण्यात यश आले. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या विजेत्या वोझनियाकिला २०व्या मानांकित माग्दा लिनेटविरुद्ध पुढे चाल मिळाली. वोझनियाकिने पहिला सेट ६-२ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये ती २-० अशा आघाडीवर होती. त्यावेळी लिनेटने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. दुसरीकडे, अ‍ॅनिसिमोव्हाने १३व्या मानांकित सॅमसोनोव्हाला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

बेरेट्टिनीची माघार

इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीने पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. बेरेट्टिनीने २०२२मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यंदाच्या पहिल्या फेरीत त्याचा स्टेफानिस त्सित्सिपासशी सामना होणार होता. मात्र, तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे आयोजकांनी रविवारी सांगितले.

गतविजेत्या अरिना सबालेन्काने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेला धडाकेबाज सुरुवात केली. तिने पहिल्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या एला सायडेलचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.हा सामना मी विसरू शकणार नाही. थिआगो फारच प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याच्याविरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही. तो फार सुंदर फटके मारतो. थिआगोने गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेत डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का दिला होता. पाचव्या सेटमध्ये मी चुका केल्यानंतर थिआगो आता मलाही पराभूत करणार अशी भीती वाटू लागली होती. मात्र, अखेरीस मला खेळ उंचावता आला याचे समाधान आहे. – आंद्रे रुब्लेव्ह