T20 World Cup 2022 : भारताचा सुपर १२ क्वालिफायर्समध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिज मात्र बाहेर!

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठी थेट सुपर १२ क्वालिफायर्समध्ये प्रवेश करण्याऱ्या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे.

T20 world cup 2021 india vs scotland live match updates

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठी थेट सुपर १२ क्वालिफायर्समध्ये प्रवेश करण्याऱ्या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणाऱ्या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत थेट सुपर १२ मध्ये प्रवेश मिळेल. सुपर १२ मध्ये रँकिंगनुसार क्वालिफाय करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.

दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून पराभव केला आणि पुढील विश्वचषकातली सुपर १२ पैकी आठ संघ निश्चित झाले. या पराभवामुळे वेस्ट इंडिज क्रमवारीत दहाव्या तर बांगलादेशचा संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया टॉप सहा संघ आहेत. तर, अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान  शेवटचा सामना हरेल तरीही ते क्रमवारीत ८व्या क्रमांकाच्या खाली जाणार नाही.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ आता पहिल्या फेरीत श्रीलंका, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या संघाशी खेळणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची या विश्वचषकात कामगिरी अत्यंत खराब राहिली. वेस्ट इंडिजला पाच चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Automatic super 12 qualifiers for t20 world cup 2022 confirmed india gets entry hrc

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या