Avesh Khan traded to RR and Devdutt Padikkal traded to LSG : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामासाठी लवकरच खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये अनेक नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. आयपीएल फ्रँचायझी काही खेळाडूंवर पैज लावू शकतात, ज्यांनी २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२३ लिलावापूर्वी काही संघ त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करत आहेत. आता या यादीत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचीही नावे जोडली गेली आहेत. या दोन्ही संघांनी आयपीएलच्या नवीन हंगामासाठी प्रत्येकी एक खेळाडू बदलला आहे.

आवेश खान आणि देवदत्त पडिक्कलची अदला-बदली

बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सने आवेश खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी सरळ ट्रेड करार केला आहे. त्यानंतर आता आवेश खान आयपीएलच्या नवीन हंगामात राजस्थान रॉयल्सकडून आणि देवदत्त पडिक्कल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
Advocate Ujjwal Nikam
मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांचा पत्ता कट
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
lok sabha election in punjab four way contest in punjab bjp contest elections alone in punjab
Lok Sabha Polls 2024: पंजाबमधील चौरंगी सामन्यात दलबदलूंवरच भिस्त

देवदत्त पडिक्कलची आयपीएलमधील ही तिसरी फ्रँचायझी असेल. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून तो खेळला आहे. सलामीवीर म्हणून त्याच्या आयपीएल कारकिर्दीची प्रभावी सुरुवात केल्यानंतर देवदत्तचा राजस्थानने त्यांच्या संघात समावेश केला होता. पण त्याचा शेवटचा सीझन काही खास नव्हता. पडिक्कलच्या समावेशामुळे काइल मेयर्स, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांसारख्या खेळाडूंसह सुपर जायंट्सचे आधीच मजबूत फलंदाजी युनिट आणखी मजबूत होईल.

हेही वाचा – WBBL 2023 : ब्रिस्बेन हिट्स संघाला अमेलिया केरची ‘ही’ चूक पडली महागात, VIDEO होतोय व्हायरल

आवेश खानचीही कहानी देखील अशीच आहे. आवेश खानचा आयपीएल २०२३ चा हंगाम खूप प्रभावी होता, जिथे तो एलएसजीसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला होता. परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म मंदावला आणि लखनऊमधील संथ खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना फारशी मदत करत नाहीत. आता जयपूरच्या वेगवान खेळपट्ट्यांवर आवेश खानला आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. आवेश खानच्या आगमनानंतर राजस्थानची वेगवान गोलंदाजीची फळी मजबूत होईल. या संघात अगोदरच नवदीप सैनी, कुलदीप सेन आणि प्रसिध कृष्णासारख्या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.