सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग २०२३ या स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील प्लेऑफचा सामना इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पेशावर झाल्मी संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. शुक्रवारी त्याने शानदार फलंदाजी करताना आणखी एक विक्रम केला. तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ९००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेलचा विक्रम मोडला –

पीएसएल अंतर्गत गुरुवारी इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पेशावर झाल्मीचा सामना पार पडला. या सामन्यात खेळताना पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने ६४ धावांची दमदार खेळी केली. त्याचबरोबर बाबरने एक मोठा विक्रम रचला आहे. त्याने सर्वात जलद नऊ हजार धावा करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलने २४९ डावात ९००० धावा पूर्ण केल्या. बाबरने केवळ २४५ डावात ही कामगिरी केली.

विराट कोहली तिसऱ्या स्थानावर –

बाबर आणि गेलनंतर विराट कोहली २७१, डेव्हिड वॉर्नर २७३ आणि अॅरॉन फिंच हे २८१ डावात नऊ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज आहेत. बाबरने २०१९ पासून सर्वाधिक टी-२० शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर ८ शतके आहेत. या यादीतील पुढचा फलंदाज जोस बटलर आहे, ज्याने ६ शतके झळकावली आहेत. युनायटेडविरुद्धच्या ३९ चेंडूंच्या खेळीत झाल्मीच्या कर्णधाराने १० चौकार मारले. युनायटेडचा कर्णधार शादाब खानने त्याला १३व्या षटकात पायचित बाद केले.

हेही वाचा – IND vs AUS ODI: आकाश चोप्राने ट्विटरवर विचारला मोठा प्रश्न; म्हणाला, ‘संजू सॅमसनला…’

या प्लेऑफच्या सामन्यात पेशावर झाल्मीने २० षटकात ८ गडी गमावून १८३ धावा केल्या. बाबरच्या ६४ सोबतच मोहम्मद हरिसने ३४, सॅम अय्युबने २३, हसिबुल्ला खानने १५, टॉम कॅडमोरने १६ आणि अजमातुल्लाहने १० धावांचे योगदान दिले. युनायटेडचा कर्णधार शादाब खानने ४ षटकात ४० धावा देत २ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam breaks chris gayles record for fastest to 9000 runs in t20 cricket in psl 2023 vbm
First published on: 16-03-2023 at 23:13 IST