सायली गोखले (एअर इंडिया) व तन्वी लाड (इंडियन ऑइल) यांच्यात अखिल भारतीय आंतर सार्वजनिक संस्था बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. पुरुष गटात सृजन नंदलोरी व केतन चहेल (दोघेही भारतीय अन्न महामंडळ) हे अंतिम फेरीत लढणार आहेत.
या स्पर्धेत सायली हिने भारतीय अन्न महामंडळाच्या वैष्णवी अय्यरचा २१-१८, २१-७ असा सहज पराभव केला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. तन्वी लाडविरुद्ध १६-२१, ७-० अशी स्थिती असताना तिची प्रतिस्पर्धी रेश्मा कार्तिक (एअर इंडिया) हिने स्नायू दुखावल्यामुळे सामना सोडून दिला. तन्वी हिने दुहेरीतही अंतिम फेरीत स्थान मिळवित दुहेरी मुकुटाच्या आशा कायम राखल्या. तिने अपर्णा बालन हिच्या साथीत व्ही.हरिका व रेश्मा कार्तिक यांच्यावर २१-८, २१-१० अशी मात केली. अन्य लढतीत अय्यर व वल्लरी बुकाने (भारतीय अन्न महामंडळ) यांनी पी.एस.लिनीमोल व श्रद्धा श्रीवास्तव (आयुर्विमा मंडळ) यांचा २१-७, २१-१३ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला.
पुरुषांच्या एकेरीत सृजनने लक्ष्य सेन (ओएनजीसी) याला २२-२०, २१-१६ असे हरवित अंतिम फेरी गाठली. अन्य लढतीत केतनने सिद्धार्थ कुमारला (आयुर्विमा) १७-२१, २१-१९, २१-१५ असे हरवले. दुहेरीत अल्वीन फ्रान्सिस व मयांक बहल (भारतीय खाद्य महामंडळ) यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
सायली गोखले, तन्वी लाड अंतिम फेरीत
सायली गोखले (एअर इंडिया) व तन्वी लाड (इंडियन ऑइल) यांच्यात अखिल भारतीय आंतर सार्वजनिक संस्था बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
First published on: 04-04-2015 at 04:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton tanvi lad in final