पॅरिस :विश्वविजेत्या अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीला प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यापूर्वी विक्रमी सात वेळा मेसी या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. दशकभराहून अधिक कालावधीपासून मेसीचा प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मात्र ३० जणांच्या नामांकन यादीत स्थान मिळालेले नाही. मेसीला यंदा प्रामुख्याने मँचेस्टर सिटी आणि नॉर्वेचा आघाडीपटू अर्लिग हालँड, तसेच पॅरिस सेंट-जर्मेन आणि फ्रान्सचा आघाडीपटू किलियन एम्बापे यांचे आव्हान असेल.

गतवर्षी कतार येथे झालेल्या ‘फिफा’ विश्वचषकात मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाचा संघ विजेता ठरला होता. मेसीने या स्पर्धेत सात गोल आणि तीन गोलसाहाय्य (असिस्ट) नोंदवले होते. फ्रान्सविरुद्ध अंतिम सामन्यात त्याने दोन गोल केले होते. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणारा ‘गोल्डन बॉल’ मिळाला होता. त्यामुळे सध्या अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये इंटर मियामीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेसीला बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी

हेही वाचा >>> IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने केला इनडोअर सराव, के.एल. राहुलने गाळला घाम, पाहा फोटो

गतहंगामात मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग आणि एफए चषक अशा तीन मोठय़ा स्पर्धा जिंकल्या. या संघातील हालँडसह सात खेळाडूंना बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हालँडने गतहंगामात सर्व स्पर्धात मिळून तब्बल ५२ गोल केले होते.

एम्बापेचा समावेश असलेल्या फ्रान्स संघाला विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याने अर्जेटिनाविरुद्ध अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवताना फ्रान्सला सामना एकहाती जिंकवून देण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेरीस फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला. एम्बापेने या स्पर्धेत एकूण आठ गोल आणि दोन गोलसाहाय्य केले होते. तसेच त्याने पॅरिस सेंट-जर्मेनसाठी सर्व स्पर्धात मिळून ४३ सामन्यांत ४१ गोल केले होते.

पाच वेळचा बॅलन डी’ओर विजेता रोनाल्डोला २००३ नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले नाही. रोनाल्डोला गेल्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तो सध्या सौदी अरेबियातील अल-नासर क्लबसाठी खेळत आहे.

महिलांमध्ये ऐताना बोनामतीसह स्पेनच्या सहा खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. स्पेनने गेल्या महिन्यात महिला विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. बॅलन डी’ओरच्या विजेत्यांची घोषणा ३० ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.

माझ्या चाहत्यांनी मेसीचा तिरस्कार करण्याची गरज नाही -रोनाल्डो

रोनाल्डो आणि मेसी यांनी दशकभराहूनही अधिक काळ फुटबॉलवर वर्चस्व गाजवले. चाहत्यांकडून या दोघांची नेहमीच तुलना केली जाते. यापैकी एकाला समर्थन करताना बरेचसे चाहते दुसऱ्यावर टीका करतात. याबाबत रोनाल्डो म्हणाला, ‘‘तुम्हाला ख्रिस्तियानो रोनाल्डो आवडतो म्हणून मेसीचा तिरस्कार करण्याची अजिबातच आवश्यकता नाही. आम्ही दोघेही चांगले खेळाडू आहोत. आम्ही फुटबॉलचा इतिहास बदलला. जगभरात आमचा आदर केला जातो आणि हे सर्वात महत्त्वाचे आहे.’’ पोर्तुगालकडून खेळताना आता रोनाल्डोला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने २०० सामने खेळताना १२३ गोल केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दोन्ही विक्रम आहेत. ‘‘मला या आकडय़ांचा अभिमान आहे. मात्र, मी इतक्यातच समाधानी नाही,’’ असे रोनाल्डोने नमूद केले.