India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कोलंबो येथील एनसीसीमध्ये इनडोअर सराव सुरू केला आहे. यावेळी स्टार यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलही इनडोअर नेटमध्ये सराव करताना दिसला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या सरावाची छायाचित्रे शेअर केली आहेत. वास्तविक, आशिया चषक २०२३चा सुपर-४ सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी, १० सप्टेंबर रोजी श्रीलंकेत होणार आहे. गट फेरीत यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया ट्वीटर अकाउंटवर टीम इंडियाच्या इनडोअर सरावाची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दिसत आहेत. वास्तविक, सुपर-४ मध्ये भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. यासाठी संघाने आतापासून सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा सराव करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

के.एल. राहुलने इनडोअर व्यायामही केला

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलला आशिया चषक गट साखळीतील पहिल्या दोन सामन्यात तो पूर्णपणे तंदुरस्त नव्हता त्यामुळे त्याला प्लेईंग११मध्ये संधी मिळाली नाही. मात्र, सुपर-४मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो इनडोअर सराव करत आहे. अशा स्थितीत राहुल पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो. मात्र, पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी जरी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त दिसत असला तरी कोणाच्या जागी खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इशान किशन आपली जागा सोडणार का? याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल, यासह राहुलची विश्वचषक संघातही निवड झाली आहे.

हेही वाचा: IND vs PAK: विश्वचषकाआधी शोएब-हरभजनमध्ये जुंपली; अख्तर म्हणाला, “वर्ल्ड कपमधून आम्ही टीम इंडियाला…”

ग्रुप स्टेजमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला

आशिया चषक २०२३ मध्ये, ग्रुप स्टेजमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी खेळला गेला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. शाहीन आफ्रिदीने भारताची टॉप ऑर्डर त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर नेस्तनाबूत केली होती. मात्र, इशान किशन (८२) आणि हार्दिक पांड्या (८७) यांनी शानदार खेळी खेळली आणि ४८.५ षटकात २६६ या सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सामने थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर पंचांनी बराच वेळ वाट पाहिली आणि दुसरा डाव न घेताच रद्द करण्याचा निर्णय घेतला.