बीसीसीआयने भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. न्यूझीलंडचा संघ या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी भारत न्यूझीलंडविरूद्ध ही मालिका खेळणार आहे. या मालिकेचा सामना महाराष्ट्रात देखील होणार आहे. जाणून घेऊया कसं आहे वेळापत्रक?

जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळले जातील. न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान असेल. तुम्हाला सांगतो की, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळवले जातील. न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान असेल. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे ही ५ सामन्यांची ही टी-२० मालिका वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० संघ २१ ते ३१ जानेवारी दरम्यान मालिका खेळणार आहे, ज्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या त्यांच्या महत्त्वाच्या तयारीला सुरुवात होईल. २०२५ च्या अखेरीपर्यंत टीम इंडियाचं वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. जून-डिसेंबर २०२५ दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे.

भारत – न्यूझीलंड वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिली वनडे – ११ जानेवारी २०२६ – बडोदा
दुसरी वनडे – १४ जानेवारी २०२६ – राजकोट
तिसरी वनडे – १८ जानेवारी २०२६ – इंदोर

भारत वि. न्यूझीलंड टी-२० मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी-२० सामना – नागपूर<br>दुसरा टी-२० सामना – रायपूर
तिसरा टी-२० सामना – गुवाहाटी
चौथा टी-२० सामना – विशाखापट्टणम
पाचवा टी-२० सामना – त्रिवेंद्रम

बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिल बैठकीत भारत-न्यूझीलंड मालिका भारतात कोणत्या ठिकाणी खेळवली जाणार, याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय भारताचा डॉमेस्टिक सीझन कधीपासून सुरूवात होणार याची माहितीही दिली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५-२६ च्या देशांतर्गत सीझनला सुरुवात दुलीप ट्रॉफीने (२८ ऑगस्ट २०२५) होईल आणि शेवट वरिष्ठ महिला आंतर-झोनल मल्टी-डे ट्रॉफीने (३ एप्रिल २०२६) होईल. रणजी ट्रॉफी १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान दोन टप्प्यात आयोजित केली जाईल.