BCCI Sponsership: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आपल्या अधिकृत भागीदारांची घोषणा केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजी हे भारतात होणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मंडळाचे अधिकृत प्रायोजक असतील. टीम इंडियाच्या जर्सीवर आता या दोन कंपनींचे लोगो दिसणार आहेत. याबाबतची माहिती बीसीसीआयंने ट्वीटरवरून ट्वीट करून दिली.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाने मंगळवारी दुपारी दोन ब्रँडबरोबर आपली भागीदारी जाहीर केली. रिलायन्स कंपनीच्या मालकीची सॉफ्ट ड्रिंक्स कंपनी कॅम्पा आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणारी कंपनी अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजी यांच्याबरोबर २०२४-२६ हंगामासाठी मंडळाचे प्रायोजक म्हणून मान्यता दिली आहे. या भागीदारीअंतर्गत, भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेव्यतिरिक्त, दोन्ही कंपन्यांकडे देशांतर्गत अंडर-१९ आणि महिलांच्या सामन्यांसाठी प्रायोजकत्व हक्क असतील.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल सीझन २०२४-२६ साठी अधिकृत भागीदार म्हणून कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजीची घोषणा केली आहे. आम्ही क्रिकेट चाहते मैदानावर रोमांचक स्पर्धा आणि भारती संघाकडून शानदार कामगिरीची वाट पाहत असतात, तसाच फॅन्सचा आनंद आणि चांगले क्षण निर्माण करण्यासाठी वाढवण्यासाठी, भारतीय क्रिकेटची उन्नती करण्यासाठी बीसीसीआय या दोन देशी ब्रँड्स, कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजीजशी करार केल्याने खूप आनंदित आहे.”

“कॅम्पा (CAMPA), रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स अंतर्गत एक वारसा ब्रँड, उत्पादनांची एक रोमांचक मालिका जाहीर करण्यासाठी आणि स्टेडियममधील चाहत्यांना नवीन-युगाचा अनुभव देण्यासाठी या सहयोगात साथ देईल आणि त्याचा खेळाडूंना लाभ होईल,” असे बोर्डाने म्हटले आहे. अ‍ॅटमबर्ग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्राहक उपकरण ब्रँडपैकी एक आहे आणि स्मार्ट चाहत्यांमध्ये आघाडीवर आहे. अलीकडेच स्मार्ट लॉक्स आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे.

हेही वाचा: IND vs AFG: रोहित-कोहलीच्या टी-२० संघातील पुनरागमनामुळे दीप दासगुप्ता नाराज; म्हणाले, “मला निवड समितीचे…”

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मानले आभार

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “भारत होम क्रिकेट सीझन २०२४-२६ साठी आमचे सन्माननीय भागीदार म्हणून कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजीजचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. उत्कृष्टतेची त्यांची कामगिरी आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आम्ही एकत्रितपणे, देशभरातील चाहत्यांसाठी अनोखे क्रिकेट अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहोत. यासाठी त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार.”

हेही वाचा: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यातील ‘राम सिया राम’ भजनावर केशव महाराजाने दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया; पाहा Video

सचिव जय शाह म्हणाले, “२०२४-२६ देशांतर्गत हंगामासाठी आमचे अधिकृत भागीदार म्हणून कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजीजचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही कॅम्पा आणि अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने क्रिकेट चाहत्यांसाठी संस्मरणीय अनुभव देण्यास खूप उत्सुक आहोत.”