IPL 2023: बीसीसीआय आयपीएल २०२४ च्या पर्वात बांगलादेश-श्रीलंकेच्या खेळाडूंवर घालणार बंदी? जाणून घ्या काय आहे कारण

IPL 2023 Updates: आयपीएल २०२३ स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान बांगलादेश आणि श्रीलंका देशाचे खेळाडू त्यांच्या सामन्यात व्यस्त आहेत..

IPL 2023 Updates
आयपीएल ट्रॉफी (फोटो-ट्विटर)

BCCI is likely to ban Bangladesh and Sri Lankan players: आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या काही कृती बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना आवडल्या नाहीत, अशा परिस्थितीत या दोन देशांच्या खेळाडूंवर आयपीएल २०२४ म्हणजेच पुढच्या हंगामात बंदी घातली जाऊ शकते. वास्तविक, दोन्ही देशांनी आयपीएल दरम्यान आपापल्या द्विपक्षीय मालिका ठेवल्या आहेत, ज्यामुळे आयपीएल संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू काही दिवस फ्रँचायझीपासून दूर राहतील.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हे खेळाडू जवळ-जवळ संपूर्ण आयपीएलसाठी उपस्थित राहणार नाहीत –

आयपीएल २०२३ मध्ये शाकिब अल हसन, लिटन दास आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यासह फक्त तीन बांगलादेशी खेळाडू असतील आणि तिन्ही खेळाडू ९ एप्रिल ते ५ मे आणि पुन्हा १५ मे या कालावधीत त्यांच्या संबंधित आयपीएल संघांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय चारपैकी तीन श्रीलंकेचे खेळाडू ८ एप्रिलनंतरच आयपीएलसाठी उपलब्ध होतील. त्यात वनिंदू हसरंगा, मथिशा पाथीराना आणि महेश तिक्षाना हे खेळाडू आहेत. ८ एप्रिलपर्यंत श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे.

फ्रँचायझीचा बांगलादेशी खेळाडूंबद्दल विचार भविष्यात बदलेल –

इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “जे आहे, ते आहे. आम्ही तक्रार करू शकत नाही. कारण बीसीसीआयच इतर बोर्डांशी चर्चा करते. पण होय, फ्रँचायझी ठराविक देशांतील खेळाडूंना निवडण्यास कचरेल. बघितलं तर तस्किन अहमदला एनओसी मिळाली नाही आणि आता हे. जर त्यांना त्यांच्या खेळाडूंनी खेळवायचे नसेल तर त्यांनी नोंदणी करू नये. साहजिकच फ्रँचायझीचा बांगलादेशी खेळाडूंबद्दल विचार भविष्यात बदलेल.”

हेही वाचा – WPL 2023 MI vs UPW: महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात ‘या’ झेलवरून झाला गोंधळ, पाहा VIDEO

बीसीसीआयला वेळापत्रक दिले होते –

स्थानिक मीडियाशी बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन पापोन म्हणाले, “तुम्ही पहा, मला या विषयावर वारंवार विचारण्यात आले आणि मी तेच उत्तर दिले आहे. आयपीएल लिलावासाठी बोलावले जाण्यापूर्वी आयपीएल अधिकाऱ्यांनी आम्हाला खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल विचारले आणि आम्ही त्यांना वेळापत्रक दिले. हे जाणून त्यांनी लिलाव पुढे केला. बांगलादेशच्या सामन्यांसाठी त्याच्याकडे उपलब्ध नसण्याचा पर्याय आहे, असे मला वाटत नाही. आम्ही विचार करू, असे त्यांना सांगितले, असे नाही, तर काही शंका असतील. आम्ही ते साफ केले. खरे सांगायचे तर, मला मन बदलण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.”

सर्व काही खेळाडूंवर अवलंबून आहे –

हा सर्व मुद्दा लक्षात घेऊन बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “आपल्या बोर्डाला पटवणे हे पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर प्रमुख मंडळांनी यासाठी मार्ग काढला आहे. आयपीएलची लोकप्रियता कोणीही नाकारू शकत नाही. खेळाडूंना रिलीज करण्यामधेय बोर्डालाही त्यांचा वाटा मिळतो. परंतु त्यांनी इतर निर्णय घेतल्यास, ते त्यांच्यावर अवलंबून आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 11:28 IST
Next Story
Sachin Tendulkar: …म्हणून सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हणतात; IPL च्या ‘त्या’ सामन्यात नेमकं काय घडलं होतं?
Exit mobile version