पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेत क्रिकेट मालिका आयोजनाच्या प्रस्तावासाठी बीसीसीआयला आता केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्यांच्या सरकारकडे अनुमतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. दोन्ही देशांच्या सरकारच्या निर्णयावर या मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये मालिकेचे आयोजन होऊ न शकल्यास ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे अथवा अन्य तटस्थ ठिकाणी होणे अपेक्षित आहे. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्यात दुबईत झालेल्या चर्चेनंतर श्रीलंकेत मालिका आयोजनाचा प्रस्ताव समोर आला होता. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीसाठी पत्र पाठवल्याचे ठाकूर यांनी सांगितले.