scorecardresearch

Premium

रेयाल माद्रिदच्या विजयात बेलिंगहॅमची चमक

ज्युड बेलिंगहॅमने झळकावलेल्या निर्णायक दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर २-१ असा विजय मिळवला.माद्रिदची सामन्यामध्ये चांगली सुरुवात झाली नाही.

Bellingham shines in Real Madrid win sport news
रेयाल माद्रिदच्या विजयात बेलिंगहॅमची चमक

बार्सिलोना : ज्युड बेलिंगहॅमने झळकावलेल्या निर्णायक दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर २-१ असा विजय मिळवला.माद्रिदची सामन्यामध्ये चांगली सुरुवात झाली नाही. बार्सिलोनाच्या इकाय गुंडोगनने (सहाव्या मिनिटाला) माद्रिदच्या बचावाला भेदत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर माद्रिदकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, बार्सिलोनाच्या भक्कम बचावासमोर त्यांचा निभाव लागला नाही व मध्यांतरापर्यंत बार्सिलोनाकडे ही आघाडी कायम होती.

दुसऱ्या सत्रात, माद्रिदने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला इंग्लंडचा युवा आघाडीपटू बेलिंगहॅमला गोल करण्याची संधी मिळाली. त्याने गोल झळकावत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांकडून आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर सामन्याच्या भरपाई वेळेत बेलिंगहॅमने बार्सिलोनाच्या बचावाला चकवीत निर्णायक गोल केला व संघाला २-१ असे आघाडीवर नेले.

sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन
Neil Wagner retires
नील वॅगनर; सळसळत्या चैतन्याची अनुभूती देणारा योद्धा
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती
Narendra Modi wished Mohammed Shami his best for recovery from heel surgery
Mohammed Shami : ”तुम्ही या दुखापतीवर धैर्याने…”, शमीच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिला धीर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bellingham shines in real madrid win sport news amy

First published on: 30-10-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×