scorecardresearch

Premium

ENG vs NED: बेन स्टोक्सने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला इंग्लंडचा पहिला खेळाडू

Cricket World Cup 2023, ENG vs NED Match Updates: बेन स्टोक्सने ८४ चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने १०८ धावांची शतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील पाचवे शतक ठरले. या अष्टपैलू खेळाडूने अवघ्या ७८ चेंडूत शतक पूर्ण केले.

ENG vs NED World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
नेदरलँड्सविरुद्ध बेन स्टोक्सने शतक झळकावले (photo source- @cricbuzz)

Ben Stokes become first England player who taking more than 100 wickets also scored more than ten thousand runs: इंग्लंड संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला आहे. सलग सहा पराभवानंतर इंग्लिश संघाने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयासह आता एकूण चार संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान या सामन्यात बेन स्टोक्सने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने ४७.५ षटकांत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्टोक्सने अवघ्या ७८ चेंडूत आपले वनडेतील पाचवे आणि विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. बेन स्टोक्सने ८४ चेंडूत ६ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने १०८ धावांची शतकी खेळी खेळली. आपल्या शतकी खेळीदरम्यान स्टोक्सने एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.

AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
South Africa lost to New Zealand in Test cricket match sport news
न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा
Sadeera Samarvikrama taking an amazing catch Video Viral
SL vs AFG : सदीरा समरविक्रमामध्ये दिसली माहीची झलक! रहमत शाहचा अप्रतिम झेल घेतल्याचा VIDEO होतोय व्हायरल

आपला ११४ वा एकदिवसीय सामना खेळणारा बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेणारा आणि १०,००० हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंड संघाने १९२ धावांवर ६ विकेट गमावल्या असताना ३२ वर्षीय स्टोक्स फलंदाजीसाठी क्रीझवर आला. मात्र, त्यानंतर त्याने ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ३०० च्या पुढे नेले. स्टोक्सशिवाय डेव्हिड मलानने ७४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. वोक्सनेही ४५ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.

हेही वाचा – ENG vs NED: बेन स्टोक्सच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडचा १६० धावांनी विजय, नेदरलँड्स ठरला विश्वचषकातून बाहेर पडणारा चौथा संघ

इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यानी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण होते. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ बाद ३३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ben stokes has become first england player who taking more than 100 wickets also scored more than ten thousand runs vbm

First published on: 08-11-2023 at 22:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×