scorecardresearch

Premium

ENG vs NED: बेन स्टोक्सच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडचा १६० धावांनी विजय, नेदरलँड्स ठरला विश्वचषकातून बाहेर पडणारा चौथा संघ

Cricket World Cup 2023, ENG vs NED Match Updates: इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला.

ENG vs NED World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
इंग्लंडचा नेदरलँड्सवर १६० धावांनी विजय (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

England vs Netherland ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ४०वा सामना बुधवारी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स आमनसामने आले होते. इंग्लंडने या सामन्यात नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.

इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण झाले आहेत. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याचबरोब बेन स्टोक्स प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Indian team defeated England by 434 runs in the third Test in Rajkot
IND vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताची डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप
Sunrisers Eastern Cape In Final
SA20 : काव्या मारनच्या संघाची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये एन्ट्री! डरबन सुपर जायंट्सचा ५१ धावांनी उडवला धुव्वा
India won by 106 Run against England IND vs ENG 2nd Test
IND vs ENG : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी उडवला धुव्वा, मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद ४१ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने ३८ आणि वेस्ली बॅरेसीने ३७ धावा केल्या. सायब्रँडने ३३ आणि बास डी लीडेने १० धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीदने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर डेव्हिड विलीने दोन आणि ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ENG vs NED: बेन स्टोक्सच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडचा १६० धावांनी विजय, नेदरलँड्स ठरला विश्वचषकातून बाहेर पडणारा चौथा संघ

तत्पूर्वी, अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने इंग्लंडकडून १०८ धावा केल्या. त्याने ८४ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले. स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे. डेव्हिड मलानने ८७ आणि ख्रिस वोक्सने ५१ धावा केल्या. जो रूटने २८, जॉनी बेअरस्टोने १५ आणि हॅरी ब्रूकने ११ धावा केल्या. डेव्हिड विली केवळ सहा, जोस बटलर पाच आणि मोईन अली केवळ चार धावा करू शकले. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eng vs ned match updates england defeated the netherlands by 160 runs in world cup 2023 vbm

First published on: 08-11-2023 at 21:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×