Ben Stokes on World Cup 2023: इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी तो निवृत्ती निर्णय मागे घेणार आहे. त्याने याआधी वन डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती मात्र, आता संघाला गरज असल्याने त्याने हा निर्णय मागे घेणार असल्याचे कळते. तसेच, त्याने आयपीएलबाबतही मोठे विधान केले आहे. ‘द टेलिग्राफ’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्टोक्स यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलपासून दूर राहू शकतो जेणेकरून कामाचा बोजा हलका करता येईल. स्टोक्स आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. या मोसमातही तो चेन्नईकडून मोजकेच सामने खेळू शकला.

स्टोक्स विश्वचषक खेळण्यास उत्सुक आहे

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडला विश्वचषक ट्रॉफी पुन्हा जिंकण्यासाठी स्टोक्सची गरज असल्याने त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. याआधी त्याने वन डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, भारतात होणारा विश्वचषक तो खेळणार आहे. याबाबत त्याने संघात पुनरागमन करणार असल्याचे काही संकेत दिले आहे. निवृत्तीबाबतचा तो यू-टर्न घेऊन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी परतण्यास तयार आहे.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
Dinesh Karthik keen to play T20 World Cup
मी विश्वचषक खेळण्यास तयार – कार्तिक
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य

बेन स्टोक्स त्यासाठी पुढच्या हंगामात आयपीएलमधून बाहेर होणार आहे अशी चर्चा सुरु आहे. स्टोक्स विश्वचषक खेळण्यास उत्सुक आहे आणि जोस बटलरने त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला पुढे जाण्यास परवानगी दिल्यास इंग्लंडच्या विश्वचषक संघात त्याचा समावेश होऊ शकतो. २०१९ मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला होता, त्या विजयाचा खरा शिल्पकार हा बेन स्टोक्स होता.

हेही वाचा: Tilak Varma:  वर्ल्डकपमध्ये तिलक वर्माला संधी मिळणार का? रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला, “मी त्याच्याबद्दल आता एवढेच सांगेन…”

‘या’ कारणामुळे स्टोक्स आयपीएलपासून दूर राहू शकतो

आता प्रश्न पडतो की विश्वचषकाला काही दिवस अजून बाकी आहेत, पण स्टोक्सला पुढच्या वर्षीच्या आयपीएलमधून माघार का घेणार आहे? जाणून घेऊ या. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, पुढील वर्षी इंग्लंड भारताचा दौरा करणार आहे आणि त्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार असून मार्चमध्ये संपणार आहे. अशा परिस्थितीत कामाच्या बोजामुळे तो चेन्नई सुपर किंग्सची १६ कोटींची मोठी रक्कम नाकारण्याच्या तयारीत आहे. स्टोक्सने मे अखेरपर्यंत दोन महिने आयपीएल खेळल्यास त्याला जवळपास पाच महिने भारतात घालवावे लागतील, जे त्याच्यासाठी शक्य होणार नाही. याबाबत त्याने अधिकृत अशी माहिती दिलेली नाही.

५ ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंड ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे २०१९च्या विश्वचषक उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेन. ३२ वर्षीय स्टोक्सने आपल्या देशासाठी १०५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा: Team India: १५ ऑगस्टला टीम इंडियाचा कसा राहिलाय रेकॉर्ड? जाणून घ्या स्वातंत्र्यदिनी भारताने ‘इतके’ सामने जिंकले

स्टोक्स हा स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळू शकतो

स्टोक्सने २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या संघाला ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. अंतिम फेरीत तो सामनावीर ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या खेळीने इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले. स्टोक्सने २०१९ विश्वचषकात ११ सामन्यात ४६५ धावा केल्या होत्या. गरज पडल्यास स्टोक्स मधल्या फळीत मुख्य फलंदाज म्हणून खेळेल, असेही शक्यता वर्तवली जात आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो अद्याप गोलंदाजी करू शकलेला नाही, त्यामुळे तो फलंदाज म्हणून खेळू शकतो.