ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कूर्मगती खेळीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग टीकेचा धनी ठरत असला तरी क्रिकेटपटूंनंतर आता बॉलीवूडही त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ख्यातमान दिग्दर्शक मधुर भांडारकरने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘सामना पराभूत झाल्यामुळे युवराजच्या घरावर दगडफेक करणारे मूर्ख कोण आहेत? युवराजने आपल्याला दोन्ही विश्वचषक जिंकवून दिले, हे आपण विसरलो आहोत का?’’
बॉलीवूडमधील अभिनेता दिनो मोरियाने ‘ट्विटर’वर लिहिले आहे की, ‘‘ज्या व्यक्तींनी युवराजच्या घरावर दगडफेक करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. हा खेळ आहे, ज्यामध्ये कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार.’’
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2014 रोजी प्रकाशित
युवराजच्या पाठिंब्यासाठी बॉलीवूड सरसावले!
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कूर्मगती खेळीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग टीकेचा धनी ठरत असला तरी क्रिकेटपटूंनंतर आता बॉलीवूडही त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
First published on: 09-04-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood celebs extend full support to yuvraj singh