बेनोनी (दक्षिण आफ्रिका) : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडून मिळालेला सल्ला मला लाख मोलाचा ठरला. या सल्ल्यामुळेच मला युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एक यशस्वी गोलंदाज होता आले, असे भारताचा युवा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने सांगितले.

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत नमनने १० गडी बाद केले आहेत. ‘‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असताना बुमरा तेथे पुनर्वसन कार्यक्रमासाठी आला होता. या कालावधीत बुमराला जवळून बघता आले. त्याच्याशी संवाद साधता आला. त्याने मला महत्त्वाच्या सूचनाही केल्या आणि त्याचा मला फायदा झाला,’’ असे नमन म्हणाला.

West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
nitin menon
भारताचे नितीन मेनन सलग पाचव्यांदा विशेष पंच श्रेणीत

हेही वाचा >>>श्रेयसच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर; इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी संघनिवडीची प्रतीक्षा कायम

‘‘बुमरा माझे प्रेरणास्राोत आहे. त्याच्या गोलंदाजीच्या ध्वनीचित्रफिती पाहून मी शिकत आलो आहे. गोलंदाजाची मानसिकता आणि कौशल्य कसे असायला हवे याबाबत त्याने मला खूप चांगले मार्गदर्शन केले. अचूक ‘यॉर्कर’ कसा टाकायचा याबाबतही त्याने सूचना केल्या. मला गोलंदाजीत अधिक आक्रमकता आणण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील,’’असे नमनने मान्य केले.

नमन म्हणाला,‘‘मला अनेक वेगवान गोलंदाजांनी प्रेरित केले आहे. बुमरातर प्रेरणास्राोत आहेच. पण क्रिकेट विश्वातील अन्य वेगवान गोलंदाजांचाही प्रभाव माझ्यावर आहे. मला शोएब अख्तरचा वेगही आवडतो, डेल स्टेनचा ‘स्विंग’, मिचेल स्टार्कची आक्रमकता मला भुरळ घालते.’’